पृष्ठ २
अनुवादकाचे भाष्य
वाचताना उंबेर्तो एको यांचे म्हणणे पटू लागते. मात्र त्यांनी दिलेल्यापेक्षा वेगळ्या उदाहरणांचा विचार करता मला तरी त्यांचे विचार लागू करता येत नाहीत. विज्ञानात आधीच ओळखू येणाऱ्या विद्याचे सारभूत वर्णन करणाऱ्या संकल्पनांची व्याख्या केली जाते, असे ते म्हणतात. पण मग ते स्वत:च ओळखतात, की "पिंड", "घटनाक्रम", वगैरे, विज्ञानातील कल्पना तत्त्वज्ञानाच्या आहेत, कारण व्याख्या करण्यापूर्वी अशी काही संकल्पना कळूनच येत नसते. बरे त्यांना असे म्हणायचे असेल, की काही मूलभूत संकल्पना दिल्यानंतर विज्ञानात पुढच्या संकल्पना स्पष्ट विद्यासाठी सारमय व्याख्या असतात. पण मग पाप, पुण्य वगैरे नवकल्पनांच्या व्याख्या केल्यानंतर धर्मशास्त्रे पुढे त्या चौकटीत स्पष्ट दृश्य गोष्टीच व्यवस्थित लावतात. एको यांचे उदाहरण आहे की "पाप" या संकल्पनेत "शुक्रवारी बीफ खाणे" आणि "बिनलग्नाचा संभोग करणे" या विसंवादी वस्तू एकत्र माळल्या जातात. पण मग न्यूटनच्या विवेचनात गुरुत्वाकर्षणाचे वस्तुमान आणि त्वरणासाठीचे वस्तुमान (gravitational mass and intertial mass) या दोन अत्यंत विसंवादी गोष्टींचे "वस्तुमान" (mass) असे एकत्र ग्रहण केले जाते (हे आइन्स्टाइन यांनी लक्षात आणून दिले), हे तरी काय वेगळे? एको म्हणतात की तत्त्वज्ञानात पूर्वी समसमान भासणाऱ्या वस्तूंना वेगळे म्हणून सांगितले जाते - म्हणजे संभोग लग्नाच्या अंतर्गत असला तर हा लग्नाविना संभोगापेक्षा वेगळा, एक पुण्य तर एक पाप, असे वेगळे सांगितले जाते. पण रसायनशास्त्रात रंगहीन वायू ऑक्सिजन हा रिऍक्टिव्ह मानला जातो, तर रंगहीन वायू आर्गॉन हा इनर्ट मानला जातो - हे काय वेगळे? एको म्हणतात की "मेहुणा" शब्द "एक स्त्री-तिचा एक भाऊ-तिचा एक नवरा" या तिहीतून सहज उद्भवतो. त्याच प्रकारे "एक प्रेषित-एक प्रभुसंदेशावली-एक कृत्य" यांच्यातून प्रभु-आज्ञापालन आणि प्रभु-आज्ञा-अवमान या संकल्पना सहज उद्भवतात. एको म्हणतात की अभियांत्रिकी शक्ती असलेली विज्ञाने भाकिते सांगून वास्तू उभारू शकतात. तत्त्वप्रणाली नवविश्वनिर्माण करू शकत असल्या तरीही भाकिते करू शकत नाहीत. मार्क्सवादाने मार्क्सवादी राज्यांचा नवनिर्माण केला, पण ती राज्ये कशी असतील त्याचे भाकीत मार्क्सवादात झाले नाही, असे उदाहरण त्यांनी दिले आहे. पण चूक ठरू शकतील अशी भाकिते करणे, यातच विज्ञानाचे मूळ आहे. तसे प्रयोग करता ती भाकिते चुकलेली आहेत, असेही कित्येकदा दिसून येते, आणि त्या चुकण्यातूनच विज्ञानाची प्रगती आहे असे मानले जाते. उदाहरणार्थ न्यूटनच्या विवेचनाने इलेक्ट्रॉन कसे मार्गक्रमण करेल याचे भाकीत दिले जाते, आणि तशा प्रयोगांचा नवनिर्माण होतो. ते भाकीत चुकलेले आहे, असे दिसून येते. न्यूटनने तसे भाकीत केले, म्हणूनच तो प्रयोग घडून आला - नाहीतर तो कोणाला सुचणार होता? आणि तो प्रयोग करता जे विश्व दिसले, त्याचे वर्णन न्यूटनच्या विवरणात दिसतच नाही.
फार फार तर विज्ञानाचा तात्त्विक पाया त्या मानाने दीर्घ काळ बदललेला नाही, आणि विविध देशांमध्ये पुष्कळसा एकसारखा दिसून येतो, अन्य शास्त्रांचा तात्त्विक पाया प्रत्येक संस्कृतीत अतिशय भिन्न दिसून येतो. असे काही बदलून एको यांचे म्हणणे मला पटते. जे काही का असेना, एको यांचे या विषयावरील लेखन मला फार विचारप्रवर्तक वाटले.
लेखकाविषयी माहिती : धनंजय वैद्य बॉल्टिमोर, यू.एस.ए. येथे राहतात
त्यांना विज्ञान, तत्त्वज्ञान आणि साहित्याच्या रसग्रहणात आनंद वाटतो.
Comments
Cialis
OeehdqAn Cialis Viagra Cheap viagra Xanax Buy Klonopin
Buy Viagra online
IIBdVCSe Buy Viagra online Klonopin Cheap Valium Phentermine Buy Cialis Online
Cheapest Cialis
tqngimL Cheapest Cialis Buy Cialis Online Cheap Phentermine Buy Viagra online Cialis Buy Viagra
Buy Xanax
MLBvyzSa Buy Xanax Buy Phentermine Cheap viagra Buy Valium Ativan Ambien
विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यात फरक काय? (उंबेर्तो एको यांचे मत
This is a very interesting website, I have added ski vacations it in my favourites. This post is exactly what I am interested.I shall be pleased south beach hotels to become a regular visitor. keep up doing nice job.i have bookmarked tampa cheap flights this site and emailed it to a few friends so they can get help to it. regards
सुरेख
विचार करायला लावणारा लेख. एको यांचे काही विचार पटतात पण सर्वच पटायला कठीण जाते. शेवटच्या परिच्छेदाशी सहमत आहे. लेख विचारप्रवर्तक आहे. अनुवादाबद्दल आभार.
--राजेंद्र
विचारप्रवर्तक मत आणि टीका
उंबेर्तो एको यांचे मत येथे अनुवादित केल्याबद्दल आभार. त्यावरची धनंजयांची टीकाही तितकीच महत्त्वाची आहे.
शेवटच्या परिच्छेदात प्रस्तुत लेखक म्हणतो -
"फार फार तर विज्ञानाचा तात्त्विक पाया त्या मानाने दीर्घ काळ बदललेला नाही, आणि विविध देशांमध्ये पुष्कळसा एकसारखा दिसून येतो, अन्य शास्त्रांचा तात्त्विक पाया प्रत्येक संस्कृतीत अतिशय भिन्न दिसून येतो. असे काही बदलून एको यांचे म्हणणे मला पटते. जे काही का असेना, एको यांचे या विषयावरील लेखन मला फार विचारप्रवर्तक वाटले."
भौतिक विज्ञानाचा तात्त्विक पाया दीर्घकाळ बदललेला नाही किंवा विविध देशांमध्ये पुष्कळसा एकसारखा दिसून येतो याचे मूलभूत कारण हे आहे की हे शास्त्र एकाच 'पाश्चिमात्य' (खुल्या विचारांच्या) संस्कृतीतून निर्माण झाले आहे.भौतिक विज्ञान या संज्ञेची व्याख्या त्या एकाच संस्कृतीपुरती मर्यादित आहे. (ज्याला सोप्या भाषेत * विज्ञान-धर्म *असेही म्हणता येईल.)
हीच विचारधारा अथवा तात्त्विक चौकट सार्या विश्वात मान्य होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तीपासून मानवाला मिळालेली दृश्य (भौतिक) सुखे. परंतु ही तात्त्विक चौकट खूपच उथळ विचारांवर आधारीत आहे असे म्हणावेसे वाटते.कारण भौतिक विज्ञान समष्टीच्या अभ्युदयाचा विचार करत नाही.मानवी मानसाचाही विचार त्यात केवळ व्यक्तीगत पातळीवर होतो.समूह मानस, आंतरिक सुख इ. अमूर्त संकल्पनांचा विचार त्यात होऊ शकत नाही.याउलट कम्युनिझम-कॅपिटॅलिझम यांसारखी नवी तत्त्वज्ञाने किंवा ईश-पापपुण्य-स्वर्गनरक-आत्मा-वचने इ.वर आधारित धार्मिक तत्त्वज्ञाने समष्टीच्या उत्थानाची आणि निकोप समूहमानसाची स्वप्ने पाहतात. (मग भले ती प्रत्यक्षात उतरतही नसतील. निखळ विज्ञान परिणामांची पर्वाच करत नाही तर याविरुद्ध निखळ तत्त्वज्ञाने केवळ परिणामांची स्वप्नेच पाहू शकतात.)
भौतिक विज्ञान या संकल्पनेत इतर उगमाच्या संस्कृतीही भागीदार असत्या तर अन्य शास्त्रांप्रमाणेच भौतिक विज्ञानालाही एक भोंगळ पाया मिळाला असता. उदा. चीनी शोधांप्रमाणे रॉकेट्स अथवा यांत्रिक घड्याळे / भारतीय शोधांप्रमाणे शून्य, खगोलशास्त्र, बीजगणित इ. गोष्टी प्रगत होऊन विश्वभर पसरल्या असत्या किंवा त्यांजमुळे मानवाचा भौतिक विकास झाला असता तर या संस्कृतींची जोड भौतिक विज्ञानाच्या तात्त्विक पायाला मिळाली असती असे माझे मत आहे.
सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने समष्टीवादी तत्त्वज्ञान आणि (आज मान्यताप्राप्त असलेले भौतिक) व्यक्तीवादी विज्ञान या दोन्ही सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. त्या दृष्टीने विज्ञानाला तत्त्वज्ञानाचा आधार आहे असे म्हणणेच चुकीचे आहे.त्यामुळेच मानवी वर्तनात विसंगती दिसून येते. 'तत्त्वज्ञान'म्हणून एका विचारसरणीचा वापर आणि भौतिक सुखांसाठी दुसर्याच विचारसरणीचा वापर असे सर्वत्र दिसून येते.
काहीसा गूढ, बंधने घालणारा, दृश्यपणे एकत्र बांधणारा, मानवाच्या मानसिक अपूर्णतेला आधार देणारा, मानवी सर्वंकष अभ्युदयाची स्वप्ने दाखवणारा गाभा भौतिक विज्ञानात असणे गरजेचे आहे. तरच ते समष्टीवादी पूर्ण तत्त्वज्ञान बनून आचरण्यास सर्वथैव योग्य ठरेल असे वाटते.
(भरपूर विषयांतर झाले आणि प्रतिसाद व्यापक झाला त्याबद्दल क्षमस्व!)
म्हटल्यास समर्पक म्हटल्यास विषयांतर
जर विषयांतर झाले असेल, तर काही प्रमाणात अनुवादकाचा प्रमाद म्हणून झाला आहे. नाहीतर प्रतिसादकर्ता थेट मुळाशीच जातो.
*************विषयांतर**************************
येथे प्रतिसादकर्ता विज्ञान म्हणजे भौतिक-विज्ञान असा अर्थ घेतो - टीका म्हणून मी (अनुवादक-टीकाकार-म्हणून) भौतिकशास्त्रातील उदाहरणे घेतली असतील म्हणून असावे. उंबेर्तो एको यांची "विज्ञानाची" उदाहरणे भाषाशास्त्र आणि मानववंशशास्त्रातली आहेत. या अभ्यासाने रॉकेट-यांत्रिक घड्याळे वगैरे प्रकारची भौतिक प्रगती होत नाही. मला वाटते "विज्ञान" म्हणून भौतिकशास्त्राबद्दलच विचार घुटमळल्यामुळे, "विज्ञान" आणि "तंत्रज्ञान" या कल्पनांची सरमिसळ होत आहे. त्यामुळे एको यांचे नेमके म्हणणे (आणि त्यावरची माझी टीका) यांच्यापासून हा प्रतिसाद वेगळ्या दिशेला गेला आहे.
प्रतिसादकर्त्याच्या काही तपशीलवार मुद्द्यांशी मी सहमत नाही.
> हे शास्त्र एकाच 'पाश्चिमात्य' (खुल्या विचारांच्या) संस्कृतीतून निर्माण झाले आहे.
अगदी भौतिकशास्त्रही "पाश्चिमात्त्य" नाही. अगदी हल्लीच्या काही शतकांपर्यंत भारतातील भौतिकशास्त्राबद्दलचे विचार त्या त्या काळातल्या अन्य देशांतील विचारांच्या मागेपुढे-जवळजवळ (कालानुरूप) होते. भारतीय भाषाशास्त्राचा (व्याकरणाच्या अभ्यासाचा) पाया हजारो वर्षांपासून जसा आहे, तसा "वैज्ञानिक" आहे. यात पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण असण्याची शक्यताच उद्भवत नाही, कारण भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी निवडलेली भाषा भारतीयच होती (हल्ली ज्या भाषेला "संस्कृत" म्हणतो ती भाषा), आणि इतके प्रगत भाषाशास्त्र कुठल्याच पाश्चिमात्त्य संस्कृतीत हल्लीहल्लीपर्यंत विकसित झाले नव्हते.
> हीच विचारधारा अथवा तात्त्विक चौकट सार्या विश्वात मान्य होण्याचे महत्त्वाचे
> कारण म्हणजे तीपासून मानवाला मिळालेली दृश्य (भौतिक) सुखे.
हे पटत नाही. जगात मानवाला मिळालेली भौतिक सुखे सगळ्यांना आवडत असली, तरी उपभोगणार्या लोकांमध्ये सुद्धा वैज्ञानिक-तात्त्विक चौकट मानताना अगदी अपवादानेच दिसतात. कदाचित प्रतिसादकर्त्याला असे म्हणायचे असेल की ही सुखे मिळाल्याचा संबंध राज्यकर्ते विज्ञानाशी लावतात, म्हणून वैज्ञानिकांना राजाश्रय मिळतो. हे बहुधा तथ्य असावे. पण भौतिक सुखे ही तंत्रज्ञानामुळे मिळतात, विज्ञानामुळे नव्हेत. आणि विज्ञानाचा तंत्रज्ञानाशी असला तर काही बादरायण संबंध आहे (किंवा त्याहून थोडाच अधिक स्पष्ट संबंध).
> सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने समष्टीवादी तत्त्वज्ञान आणि (आज मान्यताप्राप्त असलेले भौतिक)
> व्यक्तीवादी विज्ञान या दोन्ही सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत.
हे मला पटत नसले, तरी प्रतिसादकर्त्याचा मुद्दा उत्तम आहे. कारण "मत सांगणे" या दृष्टीने हे वाक्य तथ्यकथन आहे. हे "व्यक्तिवादी विज्ञान" म्हणजे काय ते मला माहीत नाही, पण असा काही प्रवाद लोकांत आहे हे निश्चित. ("व्यक्तिवादी उपभोक्तावाद", "व्यक्तिवादी राजकारण", वगैरे शब्दांचा अर्थ थोड्या प्रयत्नांनी लागतो. पण "व्यक्तिवादी विज्ञान" काय असू शकेल? तंत्रज्ञानामुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन होते, उपभोग घेऊन व्यक्तिगत सुख मिळते, वगैरे, असा काही विचार लोकांत बोललेला ऐकू येतो. पण याचा विज्ञानाशी संबंध काय असावा?) मला वाटते, "विज्ञाना"ची लोक भौतिकशास्त्राशी गफलत करतात, आणि भौतिकशास्त्राची तंत्रज्ञानाशी गफलत करतात, तंत्रज्ञानाची व्यक्तिगत उपभोगाशी गफलत करतात, आणि या तिहेरी गफलतीतून "व्यक्तिवादी विज्ञान" अशी काही कल्पना सामान्य बोलण्यात येते.
> भारतीय शोधांप्रमाणे शून्य, खगोलशास्त्र, बीजगणित इ. गोष्टी प्रगत होऊन विश्वभर पसरल्या असत्या ...
हा वाक्यखंड समजला नाही. "पसरल्या असत्या..." म्हणजे पसरल्या नाहीत का? कमीतकमी "शून्य" आणि थोडेफार बीजगणित तरी भारतातून जगभर पसरल्या आहेत... चीनमधून बारूद, कागद वगैरे तंत्रे जगभर पसरली आहेत... त्यामुळे हल्लीच्या प्रगतीत त्या भारतीय आणि चिनी संस्कृतींचा वाटा आहे की नाही, यांच्यापैकी प्रतिसादकर्त्याचे काय मत आहे, ते नीट समजले नाही. वाक्याच्या पूर्वार्धावरून असा अर्थ भासतो, की ही तंत्रे भारत-चीनमधून पसरलीत म्हणून त्यांच्या संस्कृतीचा वाटा असावा, पण एकूण प्रतिसादाचा ओघ "हे फक्त पाश्चिमात्त्य आहे" असा काही आहे...
************* समर्पक **************************
प्रतिसादकर्ता मुळाशी आणि अगदी थेट (मुळीच विषयांतर नाही) येणेप्रकारे जातो :
(१) समष्टी (२) उत्थान
यात प्रतिसादकर्ता उंबेर्तो एको यांचे समर्थन करतो. जे तत्त्वज्ञान "समष्टी" आणि "उत्थान" शब्दांची कल्पना विकसित करते, तो अर्थ त्याच तत्त्वज्ञानात लागू पडतो. वेगळ्या तत्त्वज्ञानात तो अर्थच लागत नाही. उदाहरणार्थ पूंजीवादाची (कॅपिटलिझमची) समष्टी, आणि साम्यवादाची (कॉम्युनिझमची) समष्टी यांच्या अर्थातच परस्परविरोध आहे. आणि या दोहोंचा वेगवेगळ्या ईश-धर्मांतील "समष्टी"शी अर्थाचा विरोध आहे. त्याच प्रमाणे या सर्व विचारधारांमध्ये "उत्थान" म्हणजे काय यांच्या व्याख्यांमध्ये परस्परविरोध आहे. ती ती विचारधारा मानल्याशिवाय "समष्टीचे उत्थान झाले पाहिजे" या विचाराला धारणच करता येत नाही. प्रतिसादकर्ता हा उत्तम मुद्दा उपस्थित करतो, की "समष्टीचे उत्थान झाले पाहिजे" असे काही म्हणणार्या विचारधारांनाच लोकांत "तत्त्वज्ञान" मानले जाते.
तरी मला वाटते, की याबाबत लोक *फारसा* विचार करत नसावेत. भारतातील सहा+दोन-तीन दर्शनांना कित्येक लोक "तत्त्वज्ञान" मानतात - यांच्यापैकी किती दर्शने समष्टीच्या अभ्युदयाबद्दल चर्चा करतात. (कुठलेच नाही. उदाहरणार्थ : सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे समष्टी काय आहे? तिचा अभ्युदय काय आहे? हे प्रश्न कालबाह्य आणि अयोग्य मानले पाहिजेत.)
समष्टीच्या अभ्युदयाचा विचार महत्त्वाचा आहे, याबाबत मी प्रतिसादकर्त्याशी सहमत आहे. काही तत्त्वज्ञाने समष्टीच्या अभ्युदयाची चर्चा करतात, याबद्दलही मी प्रतिसादकर्त्याशी सहमत आहे. पण काही तत्त्वज्ञाने याविषयी चर्चा करत नाहीत, आणि ही तत्त्वज्ञाने वेगवेगळ्या संस्कृतीत फळली आहेत. त्यामुळे "समष्टीच्या उत्कर्षाचे चिंतन करते, ते तत्त्वज्ञान; [करत नाही ते विज्ञान]" या वर्गीकरणाशी मी असहमत आहे.
प्रतिसादकर्ता म्हणतो :
> काहीसा गूढ, बंधने घालणारा, दृश्यपणे एकत्र बांधणारा, मानवाच्या मानसिक
> अपूर्णतेला आधार देणारा, मानवी सर्वंकष अभ्युदयाची स्वप्ने दाखवणारा गाभा
> भौतिक विज्ञानात असणे गरजेचे आहे.
"भौतिक विज्ञान" हे (एकमेव म्हणून) जरी लेखाच्या विषयाला अवांतर असले, तरी विचार चांगलाच आहे. गोम ही आहे, की अधिकारवाणीने बंधने घालू शकणारा, [गूढ बंधने असल्यास अधिकारवाणी अपरिहार्यच], असा फक्त कोणी द्रष्टा प्रेषितच असू शकतो. जगातील सर्व देशांत (पश्चिमेत आणि पूर्वेत, दोन्हीकडे) अनेक तेजस्वी पुरुष आणि काही तेजस्वी स्त्रिया अधिकारवाणीने असा प्रचार करत आहेत. काही जण बराच लोकसंग्रह करण्यात सफलही होत आहेत.
माझ्या दृष्टीने वैयक्तिक उत्तर :
माझ्यासाठी तरी सध्याची वैज्ञानिक विचारसरणी या सर्व बाबतीत ठीक आहे -
१. ज्याबद्दल ज्ञान आहे, त्यापेक्षा ज्याबद्दल ज्ञान नाही अशा गोष्टी विश्वात अधिक आहेत - विश्व गूढ आहे.
२. अनेक गोष्टी माझ्या शक्तीबाहेर आहेत - माझ्यावर बंधने आहेत
३. अधूनमधून ज्ञानाचा बारीकसारीक कोष शोधून सापडतो - अपूर्णतेला थोडासा आधार मिळतो, आशावाद जागृत राहातो
४. अभ्युदयाची स्वप्ने बघणे ही माझी प्रकृती आहे, (वैज्ञानिक विचारसरणी याला वाव देते) [अभ्युदय म्हणजे काय? कठिण प्रश्न आहे, पण यात आनंद वाटावा, अधिक वाटावा, असा काही विचार आहे. मला वाटावा, अन्य मानवांना वाटावा, हा विचार आहे. आनंद म्हणजे काय?... प्रश्न संपणार नाहीत...]
विचारप्रवर्तक
एको यांच्या लेखात मांडलेल्या कल्पनांइतकाच आपला अनुवादही विचारप्रवर्तक वाटला .या लेखाचा अनुवाद करून तो उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
राधिका