एका संस्थेत सोळा प्रशिक्षणार्थी घ्यायचे होते.प्राथमिक चाचणी घेऊन सोळा जण निवडले.त्यांना अंतिम कसोटीसासाठी बोलावले.सर्वांना एका वर्गात बसवून पुढील प्रमाणे निवेदन केले :--
- या कसोटीत सोळा जणांचा संघ भाग घेईल.तुमची नावे आणि क्रमांक या फलकावर आहेत.
- तुम्ही फलकाकडे तोंड करून एका मागे एक असे उभे राहायचे.प्रथम क्र.१. त्याच्या मागे काही अंतरावर क्र. २.त्याच्या मागे क्र.३...या प्रमाणे शेवटी क्र.१६.
- तुमच्या हाती एक साधन असेल. त्यावर दोन बटणे असतील.काळे आणि पांढरे.
- प्रत्येकाच्या डोळ्याला पट्टी बांधली जाईल.
- प्रत्येकाच्या डोक्यावर एक टोपी घातली जाईल. ती काळी असेल अथवा पांढरी.
- आता सर्वांच्या डोळ्यांवरील पट्ट्या काढल्या जातील.क्र.१६ ला त्याच्या पुढील पंधरा टोप्या दिसतील. या प्रमाणे क्र. १० ला नऊ दिसतील .तर क्र. १ ला एकही टोपी दिसणार नाही.
- परीक्षक सर्वप्रथम क्र. १६ ला प्रश्न विचारतील ,"तुझ्या डोक्यावर काळी टोपी आहे की पांढरी?"उत्तरासाठी त्याने साधनावरील बटण दाबायचे.काळे दाबल्यास फलकावर त्याच्या नावापुढे "काळी" असे उत्तर उमटेल.
- हाच प्रश्न क्र.१५ला,१४ ला..असा विचारला जाईल. शेवटी क्र. १ला हाच प्रश्न असेल.
- फळ्यावरील सर्व उत्तरे सर्वांना दिसतील.
- सोळांतील किमान पंधरा उत्तरे अचूक ठरल्यास सोळा जणांच्या संघाची निवड होईल. अन्यथा एकाचीही नाही.सांघिक कामाचे महत्त्व तुम्ही जाणताच.
- अजून पंचवीस मिनिटांनी प्रत्यक्ष कसोटी सुरू होईल.तोवर चर्चा करून तुम्ही रणनीती ठरवा.बाहेर कुणाशीही संपर्क साधायचा नाही.कसोटीच्या वेळी काहीही बोलणे खाणाखुणा करणे, दुसर्याला स्पर्श करणे निषिद्ध आहे.
अवयव कोणते?
१७५७०५१ या संख्येचे १ व ती संख्या सोडून किती अवयव आहेत आणि ते कोणते?
प्रेषक: वैभव कुलकर्णी
तर निदान पंधरा उत्तरे अचूक येण्यासाठी त्यांनी कोणती रणनीती (स्ट्रॅटेजी) ठरवावी?
Comments
तर्कक्रीडा: सांघिक परीक्षा
You have a great vision. I do not agree 642-524 practice exam with all you stated, but your thoughts are definitely interesting and worth reading 642-566 practice exam keep up doing good job. I truly appreciate your way of presenting such an excellent suggestion. I want more 642-611 practice exam and i will come back here, regards
उत्तर इथेच की व्यनिने?
हे कोडे या सम हेच आहें.त्यामुळे पांढरेशुभ्र आहे. नसते तर काळेकुट्ट दिसले असते.
मग उत्तर इथेच द्यावे की व्यनिने?
सांघिक परीक्षा: उत्तर
उत्तर: रणनीती :१.प्रत्येकजण त्याला दिसणार्या पांढर्या टोप्या मोजील.२.प्रथम क्र.१६ ला प्रश्न विचारणार.त्याने मोजलेल्या पां.टो. ची संख्या सम असल्यास तो " पांढरी" असे उत्तर देईल. समजा त्याचे उत्तर "काळी" तर त्याला विषम पां.टो. दिसत आहेत हे क्र.१५ ओळखील.३.आता क्र.१५ ला दिसणार्या पां.टो. विषम असतील तर आपली टोपी काळी; सम असतील तर आपली टोपी पांढरी हे त्याला समजेल.४ .ज्याप्रमाणे क्र.१६ च्या उत्तरावरून क्र.१५ ला आपल्या टोपीचा रंग समजला त्याप्रमाणे क्र.१५ च्या उत्तरावरून क्र.१४ आपल्या टोपीचा रंग अचूक ओळखू शकेल.५.असे पुढे जात जात क्र.२ च्या उत्तरावरून क्र.१ ला आपल्या टोपीचा रंग निश्चित करता येईल.६. याप्रमाणे क्र.१६ सोडता इतर १५ जणांची उत्तरे अचूक येतील.
...........य . ना. वालावलकर
*******************************************************************************************
सांघिक परीक्षा
वा! विसुनाना, वा! साधु, साधु! तुमचे व्यनि उत्तर थोडक्यात पण अगदी बरोबर आहे. असेच उत्तर अपेक्षित होते.
अचूक उत्तर सर्वप्रथम पाठविणारे तुम्हीच. तसेच तुमच्या इथे दिलेल्या पतिसादात (..या सम..) उत्तर मोठ्या खुबीने सूचित केले आहे.
अभिनंदन!!
...यनावाला
असे मी विचरतोय
-विसुनाना (संकेतनामापुरता खराखुरा :))
भाग गेला शीण गेला|अवघा झालासे आनंद||
श्री.अमित कुलकर्णी यांनी १७५७०५१ या संख्येचे अवयव विचारले आहेत.असे दिसते की, १४००>संख्येचे वर्गमूळ >१३००. यावरून कांही संभाव्य संख्यांनी दिलेल्या संख्येला भागून पाहिले.(लघुगणक---कॅल्सी--वापरला). तेव्हा १३६१ ने नि:शेष भाग गेला.म्हणूनः
1757051=1361 गुणिले १२९१
......................................य . ना. वालावलकर
१७५७०५१
हे कोडे श्री. वैभव कुलकर्णी यांचे आहे.मी दिलेल्या उत्तरात (भाग गेला..) ते श्री. अमित कुलकर्णी यांचे असे म्हटले आहे. ती चूक झाली. कृपया क्षमध्वम्.
..........................................यनावाला.