अक्षौहिणी
महाभारतात भारतीय युध्दामध्ये अठरा अक्षौहिणी योध्दे लढले व बोटावर मोजण्या एवढेच जिवंत राहिले हे सर्वाच्या लक्षात असते. पण एक अक्षौहिणी म्हणजे नक्की किती
हे माहित असतेच असे नाही.आज त्याचे कोष्टक पाहू.
१ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति = १ पत्ति
३ पत्ति = सेनामुख
३ सेनामुख = गुल्म
३ गुल्म = गण
३ गण = वाहिनी
३ वाहिनी = पृतना
३ पृतना = चमू
३ चमू = अनीकिनी
१० अनीकिनी = अक्षौहिणी
एका अक्षौहिणीत
२१८७० गज
२१८७० रथ
१०९३५० पायदळ
६५६१० अश्व. [अबब !]
शरद