
आधुनिक भूर्जपत्र
आधुनिक भूर्जपत्र
कागदाचा शोध लागावयाच्या आधी झाडांच्या पानावर लेखन करत. खास झाडांच्या पानांना भूर्जपत्र म्हणत. कागद उपलब्ध झाल्यावर त्यांचा उपयोग कमी कमी होऊ लागला. पण संपूर्ण थांबला असे म्हणता येणार नाही. हल्लीच आम्ही त्याचा उपयोग पाहिला. त्याचे असे झाले संध्याकाळी आम्ही मित्र एका बागेत जमतो, अर्धा तास गप्पा मारतो,घरी परततो.
आमचे एक नवीन मित्र उपक्रमवासी नाहीत. यनावाला सर त्यांना म्हणाले " एक लेख वाचा ना". त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे पण उपक्रमचा पत्ता नव्हता. आणि या पत्त्यात mr, org वगैरे भानगडी असल्याने लिहून घेणे गरजेचे होते. पेन मिळाले पण कुणाकडे कागद मिळेना. आसपास शोधावयाचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. इतक्यात पायापाशी असलेल्या एका निलगिरीच्या, वाळलेल्या, पानाकडे लक्ष गेले आणि त्याचाच उपयोग कागदासारखा करण्यात आला. त्यावरच mr.upakram.org लिहून ते पान खिशात टाकून ते घरी गेले.दुसऱ्या दिवशी त्यांनी लेख वाचल्याचेही सांगितले. त्या आधुनिक भूर्जपत्राचा फोटो आपणही बघा.
Comments
Cheap Phentermine
LtfpRVNp Cheap Phentermine Ativan Buy Viagra online Viagra Xanax
Buy Ativan
hdFUdiDA Buy Ativan Buy Tramadol Cheap viagra Buy Klonopin Cialis
Cheap viagra
pSmzpodN Cheap viagra Buy Phentermine Cialis Cheapest Cialis Buy Viagra online Viagra
Ambien
llCaxMbS Ambien Cheap Phentermine Cheap Ativan Viagra Buy Xanax Buy Valium
मस्त
भूर्जपत्र आवडले. प्राचीन काळी भूर्जपत्रासाठी कोणती पाने वापरत असत? आणि जुनी झाल्यावर त्यांना जाळ्या पडत नसाव्यात का?
-- राजेंद्र
अवांतर
प्राचीन काळी लिहीण्यासाठी "भूर्ज" झाडाची सालं वापरत असत. पानं नव्हे. (याची पानं जास्वंदाच्या पानासारखी असतात)
केवळ पुस्तकात वाचलेल्या या भूर्जच्या झाडांना पहाण्याचा नुकताच योग आला.
व्हैली ऑफ फ्लॉवर (उत्तरांचल) ला भूर्ज ची खुप झाडे आहेत.
आमच्या गाईड ने सांगीतलं की भूर्ज चे झाड खुप जुनं झालं की त्याची १-१ मी. पर्यंत कागदाच्या जाडी ची साल निघते. लालसर तपकीरी रंगाची ही साल कोरडी करुन १०० वर्षांपर्यंत चांगली रहाते.
- गणेश.
नाडीपट्टी
मला तर ही नाडीपट्टी आहे कि काय? असे वाटले
मस्त...
आधुनिक भूर्जपत्रावरचे लेखन आवडले. आपल्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते.
लेखनासाठी कोणती शाई वापरलीत? :-)
-सौरभ.