कूटप्रश्न, गूढप्रश्न

कूटप्रश्न

प्रमोद सहस्रबुद्धे, वैभव कुलकर्णी

१.

(आकडे भरा) भागलेली संख्या १० आकडी, ज्याने भागितले ती संख्या ६ आकडी, भागाकार पूर्ण बिना शिल्लक, भागाकार ५ आकडी)

- - - - ७ - )- - ७ - - - - - - -(- - ७ - -
- - - - - -
_______

- - - - - ७ -
- - - - - - -
_______
- ७ - - - -
- ७ - - - -
______

- - - - - - -
- - - - ७ - -
_______
- - - - - -
- - - - - -
_______

२.

बुद्धीबळातील हत्ती घ्या. कुठल्याही कोपर्‍यापासून सुरु करा. आपल्याला त्याला या कोपर्‍या पासून त्या (विरुद्ध) कोपर्‍यापर्यंत न्यायचे आहे. यातले नियम असे. प्रत्येक घरात हत्ती एकदाच गेला पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही. जाताना सर्व घरातून गेला पाहिजे.
उत्तर लिहिताना ( अ ब क ड इ फ ग ह आणि १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ हे संकेत वापरा. म्हणजे अ१ म्हणजे डावीकडच्या कोपरा. तर ब५ म्हणजे डावीकडून दुसरी रांग (कॉलम) खालून पाचवी ओळ (रो).

३.

एक नऊ अंकी संख्या ज्यात १ ते ९ सर्व अंक आहेत. या संख्येला ९ ने नि:शेष भाग जातो. एकम स्थानातील अंक काढला तर उरलेल्या संख्येला ८ ने नि:शेष भाग जातो. एकम आणि दशम स्थानातील अंक काढले तर उरलेल्या संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो. असे करत करत शेवटच्या अंकाला १ ने भाग जातो. तर ती संख्या कोणती?
 
 

कूटप्रश्न १ व २: प्रमोद सहस्रबुद्धे

कूटप्रश्न ३: वैभव कुलकर्णी

गूढप्रश्न

हैयो! हैयैयो!

वाचकमित्रहो, नमस्कार. ह्याच दिवाळी अंकामध्ये इतरत्र मी लिहिलेला नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास हा लेख आपण वाचला असेलच. नाडिग्रंथांमधून जन्मदिनांकाची नोंद कशी येते हे मी त्या लेखामध्ये वाचकांच्या अभ्यासार्थ संक्षेपामध्ये दिलेले आहे. दिलेल्या श्लोकाच्या विवेचनामध्ये श्लोकांतील शब्दांतून माहिती मिळवून जन्मदिनांक कसा काढावयाचा हेही सांगितलेले आहे. त्या सा-या माहितीच्या सहाय्याने वाचकास स्वत: प्रयत्न करून गूढप्रश्न उकलण्याचा आनंद मिळावा म्हणून पुढे एक श्लोक मराठीभाषेमध्ये रूपांतरीत करून देतो आहे. खालील श्लोक आपल्या येथील एका सदस्याने अभ्यासाठी पुरविलेल्या वहीतून घेतला असून हा मूळ तमिळभाषेतील असलेला श्लोक खास उपक्रमच्या वाचकांसाठी जसा च्या तसा मराठीभाषेमध्ये भाषांतरीत केला आहे.

श्लोक:

त्या संवत्सरी नलनाम कुंभमासी
त्याकुणीसा तिथीवरी उशनावारी
वसुपुन: नक्षत्र गुरुमेषधडी
मिथुनमनी पुढे निळ्या सर्पधन्वी
धन्वेतरी न सांगे सारे ते कलशी

वाचकांनी स्वत: श्लोकाचा अभ्यास करून आंग्लभाषेमध्ये जन्मदिनांक काढून द्यावा. त्यासंबंधी आपणास हवी ती माहिती सहजगत्या गूगल् येथे उपलब्ध आहे. शक्य झाल्यास जन्मरास, नक्षत्र आणि कोणते ग्रह कोण्या राशीत आहेत ह्यापैकी जे काही शक्य होईल तेही काढून द्यावे. गूढप्रश्नाचे उत्तर उपक्रम येथे खरडवही अथवा व्यनि ने पाठवू शकता. विजेत्याचे नांव आणि उत्तर यथावकाश प्रसिद्ध केले जाईल.

पुनश्च एकवार दिवाळी निमित्ते हार्दिक शुभेच्छा!

---