इंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला प्र...