सूचीशास्त्र : काही अनुभव - १

डॉ. मीरा घांडगे

संशोधनाची सुरुवात सूचीपासूनच व्हावी असे अपेक्षित आहे/असते. कोणत्याही क्षेत्रातील संशोधन करताना पूर्वसूरीने केलेल्या कामाची पूर्णपणे माहिती असल्यास ते कार्य पुढील काम करण्यास मार्गदर्शक ठरते. आजच्या प्रगतिशील, विस्तारशील, विज्ञाननिष्ठ क्षेत्रात किंवा साहित्यक्षेत्रातही जिज्ञासू अभ्यासकाला नेमकी माहिती मिळवून देण्याचे काम सूची करते. सूची हा शब्द निर्देश, मार्गदर्शिका अशा अर्थाने वापरला जातो. प्रकाशित ग्रंथ किंवा अप्रकाशित हस्तलिखितांच्या विशिष्ट नियमानुसार केलेल्या यादीच्या आधारे हवे असलेले संदर्भ अचूकपणे शोधणे शक्य होते तिला ’सूची’ म्हणता येईल. सूचीचा संबंध अध्यापनाशी आणि संशोधनाशी विशेषत्वाने असतो. म्हणूनच संशोधनासाठी केलेली सूची अचूक, जास्तीत जास्त निर्दोष असणे गरजेचे असते.

भाग १

सूची हा संशोधनाचा ’पाया’ आहे. आपल्या संशोधन विषयासंबंधी सखोल ज्ञान मिळविण्यासाठी, त्यासंबंधीची अचूक माहिती मिळविण्यासाठी सूची हेच महत्त्वाचे व एकमेव साधन असते. ज्ञानाची कक्षा व क्षेत्रे आजच्या काळात वाढत असताना संशोधन क्षेत्रात सूचीला अनन्यसाधारण दर्जा प्राप्त झाला आहे. माणसाला (संशोधकाला) आपला वेळ व शक्ती वाचवायची असेल तर त्याला सूचीशिवाय पर्याय नाही.

लेखनकला अवगत झाल्यापासून माणसाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम हस्तलिहिते, भूर्जपत्रे, ताम्रपट, दोलामुद्रिते यांनी केला; पण त्याकाळी त्यांची संख्या मर्यादित असावी किंवा त्याकाळी स्मरणात राहील यानुसार यादी बनवली जात असावी. दैनंदिन व्यवहारात सुलभतेसाठी त्याकाळी याद्या बनविल्या जात असाव्यात; पण अशा याद्या करण्यामागे कोणतीही तात्त्विक अथवा शास्त्रीय बैठक नसावी. मुद्रितकला अवगत झाल्यापासून विविध प्रकारची, विविध विषयांची प्रकाशने मोठ्या प्रमाणात होऊ लागली. लेखनाचा प्रचार व प्रसार झाला. कालमानाने त्यांची प्रगती व सखोलता वाढली. आज एकविसाव्या शतकात संगणकाच्या जाळ्यातून (इंटरनेट) विविध विषयांवरील प्रगत अद्ययावत माहिती मिळू लागली. कमीत कमी वेळात, कमी श्रमात सहजपणे हे ज्ञान उपलब्ध होण्यासाठी सूची हे साधन अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे ठरले.

आजच्या काळातील वाढती ज्ञानाची झेप, त्यातील अनेक विषयांशी परस्परसंबंध, व्याप्ती, सखोलता लक्षात घेता अचूक माहिती मिळण्याचे आव्हान सूचीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. म्हणूनच संशोधन क्षेत्रात सूचीला अनन्यसाधारण महत्त्व व दर्जा प्राप्त झालेला आहे. सूची अनेक प्रकारच्या केल्या जातात.

सूचींचे स्वरूप :

लेखनकला अवगत झाल्यापासून माणसाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम हस्तलिहिते, भूर्जपत्रे, ताम्रपट, दोलामुद्रिते यांनी केला; पण त्याकाळी त्यांची संख्या मर्यादित असावी किंवा त्याकाळी स्मरणात राहील यानुसार यादी बनवली जात असावी. दैनंदिन व्यवहारात सुलभतेसाठी त्याकाळी याद्या बनविल्या जात असाव्यात; पण अशा याद्या करण्यामागे कोणतीही तात्त्विक अथवा शास्त्रीय बैठक नसावी. मुद्रितकला अवगत झाल्यापासून विविध प्रकारची, विविध विषयांची प्रकाशने मोठ्या प्रमाणात होऊ लागली. लेखनाचा प्रचार व प्रसार झाला. कालमानाने त्यांची प्रगती व सखोलता वाढली. आज एकविसाव्या शतकात संगणकाच्या जाळ्यातून (इंटरनेट) विविध विषयांवरील प्रगत अद्ययावत माहिती मिळू लागली. कमीत कमी वेळात, कमी श्रमात सहजपणे हे ज्ञान उपलब्ध होण्यासाठी सूची हे साधन अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे ठरले.

जागतिक, राष्ट्रीय, भाषावार, विषय ग्रंथसूची, ग्रंथकार, निवडक ग्रंथसूची, व्यापारी ग्रंथसूची इ. सारख्या सूची ग्रंथांच्या संदर्भात केल्या जातात. एखाद्या ग्रंथालयात असलेल्या ग्रंथांची चटकन माहिती मिळविण्यासाठी ’ग्रंथकार-ग्रंथनाम’ सूची जवळजवळ सर्वच ग्रंथालयात उपलब्ध असते. सूची ग्रंथालयाचा ’आरसा’ असते. एखाद्या अभ्यासकास विशिष्ट ग्रंथकाराचे कोणते ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध आहेत किंवा एखाद्या ग्रंथकाराचा एखादा ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध आहे का? याचा शोध सहजतेने लागतो. याला ग्रंथालयीन-सूची असेही म्हणतात. त्याशिवाय वृत्तपत्रांची सूची, (उदा. ’केसरी’ वृत्तपत्राची सूची) नियतकालिकांची सूची, निर्देशसूची अशा विविध सूची अभ्यासकांना उपयुक्त ठरतात. सर्वच वाचक-संशोधक एखादे (समीक्षात्मक संदर्भ) पुस्तक संपूर्णपणे वाचतील असेही नाही. त्याची आवश्यकताही नसते. अभ्यासकाला आवश्यक असणारी माहिती ग्रंथात कोणत्या पृष्ठावर आहे हे निर्देशसूची अचूकपणे सांगते. त्यासाठी ग्रंथालयातील कोणकोणत्या नोंदी अभ्यासकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत याची जाण सूचीकाराला असणे आवश्यक असते. खरे तर प्रत्यक्ष लेखकाने ही निर्देशसूची करणे आवश्यक वा शक्य असते. कारण ग्रंथालयातील महत्त्वाच्या नोंदी, विषय त्याला माहीत असतात; पण ग्रंथकार आणि सूचीचे ज्ञानया दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीकडे अवगत असतील, अशा व्यक्ती दुर्मीळ आहेत. अशावेळी तज्ज्ञ-जाणकार निर्देशसूचीकाराने निर्देशसूची करणे इष्ट ठरते. ग्रंथाचा विषय लक्षात घेऊन ग्रंथातील ग्रंथकार-ग्रंथनाम-विषय-संज्ञा-संस्था-घटना इ. सह अभ्यासकाला आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या विविध नोंदी निर्देशसूचीत येणे आवश्यक असते. यासाठी सूचीकाराला त्याचे ज्ञान व योग्य ते तारतम्य असणे महत्त्वाचे ठरते.

मराठीतील सूची वाङ्मय :

मराठीतील पहिली ग्रंथसूची इ.स.१८५९ मध्ये ’पुस्तकांची नामवही’ या नावाने शामराव मोरजी यांनी तयार केली. य. रा. दाते यांचा महाराष्ट्रीय ग्रंथसूची हा ग्रंथ १९१९ मध्ये प्रकाशित झाला. मराठी भाषेतील ग्रंथसूची करण्याचे काम कै. शंकर गणेश दाते यांनी केले. आपले सर्व आयुष्य या कामासाठी खर्च करून सूचीसाठी शिस्त, चिकाटी आणि परिश्रमाच्या साह्याने एकूण ३२,००० ग्रंथांची सूची (१८००-१९३७) तयार केली. त्याची सुधारित आवृत्ती २००० मध्ये राज्यविकास संस्थेने प्रसिद्ध केली. १९३८ ते १९५० या काळातील ग्रंथांची सूची १९६१ मध्ये प्रसिद्ध झाली. ग्रंथकार सूचीमध्ये श्री ज्ञानेश्वर : वाङ्मयसूची (१९६८) म. प. पेठे, ज्ञानेश्वर : व्यक्ती व काव्यलेखन सूची (१९९१) श्री. शशिकांत भगत व वृत्तिका धामणकर यांनी केली आहे. संत तुकाराम, संत रामदास यांच्या लेखनसाहित्यावरील सूची प्रकाशित झाल्या आहेत, गोमंतकीय मराठी लेखकांची सूची (१९९५) रवींद्र घवी व सुरेश वाळिंबे यांनी पूर्ण केली आहे. मराठीतील दोलामुद्रितांची सूची (१९६६) अ. का. प्रियोळकरांनी प्रकाशित केली. तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथसंग्रहालयातील ग्रंथांची सूची सहा भागात प्रकाशित झाली. वीणा मुळे यांनी संपादित केलेली मराठी अनुवाद ग्रंथसूची (१९६८) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्राकाशित केली.

या पद्धतीने प्रयोगक्षम मराठी नाटके (१९६३), संत साहित्य संदर्भ कोश (१९९५) डॉ. मु. श्री. कानडे, मराठी विज्ञान वाङ्मयसूची (२०००), मराठीतील शास्त्रीय वाङ्मय (१९७३) अशा विषयसूचीही प्रकाशित झालेल्या आहेत. कोशांच्या सूची, प्रबंधसूची, सूचींची सूची, ऐतिहासिक साधनांची सूची प्रकाशित झाल्या आहेत. एकूणच एकविसाव्या शतकापर्यंत मराठीत अनेक विषयांच्या उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण सूची तयार होत आहेत. १९८० नंतरच्या काळात पाश्चात्य देशांत संगणकाच्या माध्यमातून सूची तयार होत आहेत. आता या संदर्भातील काही सुविधा मराठीतूनही होत आहेत. परिपूर्ण सुविधा निर्माण झाल्या तर अनेक महत्त्वाच्या सूची बिनचूक, कमी वेळात तयार होतील असे वाटते. मराठी विश्वकोशाचे खंड आता संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. ती आजच्या काळाची गरज आहे.

मराठीतील नियतकालिकांचे सूची वाङ्मय :

संशोधनक्षेत्रात नियतकालिकांना अतिशय महत्त्वाचे स्थान असते. कारण संशोधन पुस्तकांपेक्षा संशोधनात्मक नियतकालिकांना विशेष महत्त्व असते. संशोधनात्मक साहित्य प्रथम लेखरूपाने नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर काही वर्षांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध होऊन जगासमोर येते. संशोधनाचा वेग, नियतकालिकांमध्ये प्रकाशित होणार्‍या लेखांची संख्या लक्षात घेता, नियतकालिकांमधील लेखांची सूची होणे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे आहे. मराठीमधील दलित-ग्रामीण-स्त्रीवादी-आदिवासी यासारख्या वाङ्मयीन प्रवाहांविषयीचे लेखन प्रथम नियतकालिकांमधून प्रकाशित झाले. या लेखनाच्या प्रभावाने हे वाङ्मयीन प्रवाह जोरकस झाले. त्यानंतर या नियतकालिकांमधील लेखन ग्रंथबद्ध झाले. मुद्रणकला सुरू झाल्यानंतर १९व्या शतकात मोजकीच नियतकालिके निघत होती आणि या नियतकालिकांमधून त्याकाळी प्रसिद्ध होणार्‍या पुस्तकांच्या सूची प्रकाशित होत असत. १९६० नंतर या नियतकालिकांची संख्या अनेकपटीने वाढली. तर आज २१व्या शतकात नियतकालिकांच्या संख्येत आणि वैविध्यातही प्रचंड वाढ झाली आहे. प्रारंभकाळापासून ते आजतागायत प्रकाशित झालेल्या नियतकालिकांचे स्वरूप पाहता त्यांच्यामधील अगणित विषयांवरील असंख्य लेखांच्या सूचीचे काम करणे किती प्रचंड आहे, याची कल्पना करणेही कठीण होईल.

१ | |