ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण

आशिष महाबळ

'मराठीमध्ये काही राम राहिलेला नाही' असे बरेचदा ऐकायला मिळते. मराठीचा प्रसार व्हायला हवा, मराठी जिवंत रहायला हवी वगैरे पण. हा जीव वेगवेगळे लोक मराठीत वेगवेगळ्या प्रकारे ओतू पाहतात. मराठी बाण्याची गरज का आहे, याबद्दल मतभेद आहेत. पण ती गरज आहे यावर मराठी न वापरणार्‍या लोकांचे सोडून इतरांचे एकमत आहे. आमच्या मते, मराठीकडे होतकरूंना आकर्षित करण्याकरता कसरती वापरायला हव्या (अर्थात शाब्दिक). शब्दखेळच नव्हे तर आवश्यकता भासल्यास (आणि ती आहेच) शब्दच्छलही योजावा.

 
भाग १

'मराठीमध्ये काही राम राहिलेला नाही' असे बरेचदा ऐकायला मिळते. मराठीचा प्रसार व्हायला हवा, मराठी जिवंत रहायला हवी वगैरे पण. हा जीव वेगवेगळे लोक मराठीत वेगवेगळ्या प्रकारे ओतू पाहतात. मराठी बाण्याची गरज का आहे, याबद्दल मतभेद आहेत. पण ती गरज आहे यावर मराठी न वापरणार्‍या लोकांचे सोडून इतरांचे एकमत आहे. आमच्या मते, मराठीकडे होतकरूंना आकर्षित करण्याकरता कसरती वापरायला हव्या (अर्थात शाब्दिक). शब्दखेळच नव्हे तर आवश्यकता भासल्यास (आणि ती आहेच) शब्दच्छलही योजावा.

शब्दखेळांचे अनेक प्रकार आहेत. हायकू अतिशय सुंदर असतात, लिमरीक्ससुद्धा अफलातून असतात. पण त्या पूर्णार्थाने कसरती नाहीत. शब्दखेळांचा सर्वोच्च मान शब्दकोड्यांना, अॅनाग्राम्सना आणि पॅलिण्ड्रोम्सना जावा. पॅलिण्ड्रोम्सना मराठीत 'विलोमपद' असा शब्द आहे. विलोमपदे तशी खूपच सोपी. एखादा शब्द किंवा वाक्य उलट-सुलट करुनही तसेच रहात असेल तर तो/ते विलोमपद. विलोम म्हणजे खरेतर उलट-दिशेने जाणारा. विलोम प्रमाणेच संस्कृतोद्भव पण उलट-सुलट सारखा या अर्थी जास्त सुयोग्य पण जऽरा भारदास्त असा शब्द आहे 'प्रतिलोम-अनुलोम-सम'. आपण 'विलोमपद'च वापरुया. इंग्रजीत अनेक प्रसिद्ध विलोमपदे आहेत. नेपोलियनला (शेवटी एकदाचे) पकडून एल्बा नामक बेटावर धाडल्यावर तो म्हणाला होता म्हणे: 'Able was I ere I saw Elba'. किंवा प्रशांत आणि अटलांटीक महासागरांना जोडणाऱ्या पनामा कालव्या संबंधीचे उद्गार घ्या: 'A man, a plan, a canal - Panama'. अनेक निरर्थक विलोमपदे सुद्धा आहेत उदा. 'Pull up if I pull up' - यातील तिन्ही भाग विलोमपदे आहेत. दोनदा आलेले 'pull up' आणि 'if I'. जर एखादे वाक्य (किंवा शब्द) उलटा करुन दूसरे वेगळे वाक्य बनवलेत, तर त्याला semordnilap म्हणतात (palindromes च्या उलट). आपण त्याला 'मलोवी' म्हणु या (संस्कृतोद्भव 'अर्धप्रतिलोम' आहेच, पण तो ही थोडा लांबलचक). उदा. 'no time to nod' चा मलोवी आहे 'do not emit on'. गम्मत म्हणजे 'sides reversed is' हे एक विलोमपद आहे. ते दोन मलोवींबरोबर वापरून मोठी विलोमपदे बनवता येतात, जसे की 'No time to nod sides reversed is do not emit on'.

इंग्रजीत अनेक प्रसिद्ध विलोमपदे आहेत. नेपोलियनला (शेवटी एकदाचे) पकडून एल्बा नामक बेटावर धाडल्यावर तो म्हणाला होता म्हणे: 'Able was I ere I saw Elba'. किंवा प्रशांत आणि अटलांटीक महासागरांना जोडणाऱ्या पनामा कालव्या संबंधीचे उद्गार घ्या: 'A man, a plan, a canal - Panama'. अनेक निरर्थक विलोमपदे सुद्धा आहेत उदा. 'Pull up if I pull up' - यातील तिन्ही भाग विलोमपदे आहेत. दोनदा आलेले 'pull up' आणि 'if I'. जर एखादे वाक्य (किंवा शब्द) उलटा करुन दूसरे वेगळे वाक्य बनवलेत, तर त्याला semordnilap म्हणतात (palindromes च्या उलट). आपण त्याला 'मलोवी' म्हणु या (संस्कृतोद्भव 'अर्धप्रतिलोम' आहेच, पण तो ही थोडा लांबलचक). उदा. 'no time to nod' चा मलोवी आहे 'do not emit on'. गम्मत म्हणजे 'sides reversed is' हे एक विलोमपद आहे. ते दोन मलोवींबरोबर वापरून मोठी विलोमपदे बनवता येतात, जसे की 'No time to nod sides reversed is do not emit on'.

लहानपणापासून त्यांच्याशी मैत्री असली तरी इतक्यात माझा विलोमपदांशी संबंध आला तो एका जपानी पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरामुळे. Yoko Ogawa च्या 'The Housekeeper and the Professor' मध्ये दोन विलोमपदांचा उल्लेख आहे: 'I prefer pi' आणि 'A nut for a jar of Tuna'. कोणीतरी विचारेपर्यंत हे लक्षातच नाही आले की मूळ पुस्तकात बहुदा जपानी विलोमपदे असणार. मग जपानी विलोमपदांची थोडी शोधाशोध झाली. आधी माहीत असलेल्या मराठी उदाहरणांची उजळणी झाली. 'रामाला भाला मारा', 'चिमा काय कामाची', 'ती होडी जाडी होती', 'तो कवी डालडा विकतो' वगैरे. शेवटच्या वाक्यात 'डालडा' ऐवजी 'जहाज' किंवा 'चहाच' वापरुन थोडी वेगळी विलोमपदे बनतात. इंटरनेटवर शोधाशोध करुनही खूप मराठी विलोमपदे काही सापडली नाहीत.

परवाच बर्कलीहून परततांना निद्रादेवीला अंतर देण्याकरता इतर खेळांबरोबर मराठी विलोमपदे बनविण्याचा खेळ आरंभला. अदिती-शिशीर, अनु आणि मी. तेंव्हा स्फुरलेली काही निरर्थक आणि काही बरी (पण सगळीच छोटी) विलोमपदे: 'पकड कप', 'डक पकड', 'डाक पकडा', 'मला सलाम', 'करता तो तारक', 'लिची नी चिली', 'ती होडी रडी होती', 'ती होळी काळी होती', 'नवरा वन', 'रुह नेहरु', 'गांधी धींगा' इ. यातील शेवटचे चालेल की नाही याची खात्री नाही - ते स्व-विरोधी आहे म्हणून नाही तर अनुस्वाराच्या स्थानामुळे. अनुस्वाराप्रमाणेच जोडाक्षरांची गत: 'सध्याचा ध्यास' किंवा 'रक्ष ते क्षर' (क्ष = क् + ष) विलोमपदे आहेत की नाहीत? अजूनच चिरफाड करायची झाली तर ह्रस्व आणि दीर्घ इकार/उकारांमधेही फारकत करता येईल. इंग्रजीत हा प्रश्न येत नाही आणि चित्रलिपी असलेल्या भाषांमधेही येणार नाही. हे किरकोळ मुद्दे बाजूला ठेवून सगळ्यांनी मिळून या यादीत भर घातली तर बहार येईल. कुठे प्रकाशित काही स्त्रोत असतील तर त्यांचीही मदत होईल. इंग्रजीइतके मराठीमधील विलोमपदे शोधण्याकरता python किंवा perl सारख्या scripting languages वापरणे मात्र अजून तितके सोपे नाही. त्याही दृष्टीने प्रयत्न झाल्यास ते अनेक ठिकाणी उपयोगी पडेल. छंदांकरता वापरतात तेच किंवा तसेच नियम वापरून प्रत्येल घटकाकरता समान आकाराचे चिन्हांकन बनवावे लागेल. त्याबद्दल खोलात शिरल्यास तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

१ |