आधुनिक भूर्जपत्र

शरद


आधुनिक भूर्जपत्र

आधुनिक भूर्जपत्र

कागदाचा शोध लागावयाच्या आधी झाडांच्या पानावर लेखन करत. खास झाडांच्या पानांना भूर्जपत्र म्हणत. कागद उपलब्ध झाल्यावर त्यांचा उपयोग कमी कमी होऊ लागला. पण संपूर्ण थांबला असे म्हणता येणार नाही. हल्लीच आम्ही त्याचा उपयोग पाहिला. त्याचे असे झाले संध्याकाळी आम्ही मित्र एका बागेत जमतो, अर्धा तास गप्पा मारतो,घरी परततो.

आमचे एक नवीन मित्र उपक्रमवासी नाहीत. यनावाला सर त्यांना म्हणाले " एक लेख वाचा ना". त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे पण उपक्रमचा पत्ता नव्हता. आणि या पत्त्यात mr, org वगैरे भानगडी असल्याने लिहून घेणे गरजेचे होते. पेन मिळाले पण कुणाकडे कागद मिळेना. आसपास शोधावयाचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. इतक्यात पायापाशी असलेल्या एका निलगिरीच्या, वाळलेल्या, पानाकडे लक्ष गेले आणि त्याचाच उपयोग कागदासारखा करण्यात आला. त्यावरच mr.upakram.org लिहून ते पान खिशात टाकून ते घरी गेले.दुसऱ्या दिवशी त्यांनी लेख वाचल्याचेही सांगितले. त्या आधुनिक भूर्जपत्राचा फोटो आपणही बघा.