मुलाखतकार - प्रकाश घाटपांडे
माहिती अधिकार व विवेक वेलणकर यांचे एक अतूट नाते आहे. माहिती अधिकाराची चळवळ जनसामान्यात फोफावण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पुणे महानगरपालिका, महावितरण, बीएसएनएल या यंत्रणांची अनेक गुपिते त्यांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांत उघड केली. सजग नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे अभियंते आहेत.
|
शहरी गोंगाटापासून लांब कुठेतरी एखाद्या खेडेगावातील वा थंड हवेच्या ठिकाणच्या वातावरणात आपल्या निवासाची व जेवणा-खाण्याची (चांगली!) सोय करण्यात येणार आहे व त्यासाठी एकही पैसा मोजावा लागणार नाही (परंतु शिबिराच्या शेवटच्या दिवशी थाळीत - लाजेकाजेस्तव का होईना - दान-देणगी टाकावीच लागते!) असे जाहीरपणे खरोखरच कुणी सांगत असल्यास...
|
सजीवांच्या पुनरुत्पादनादरम्यान जी म्यूटेशन घडतात त्यांचेही काही विवेकी 'कारण' नसते. "त्या सजीवाला केवळ असे 'वाटते' की पिल्लांना नवा जनुक अधिक फायदेशीर ठरेल" असे त्या म्यूटेशनचे वर्णन शक्य आहे. हे म्यूटेशन मूळ जनुकापेक्षा निराळी भाकिते करते. उदा., मूळ जनुक मेलॅनिन कमी बनविणारे असेल आणि नवे जनुक अधिक मेलॅनिन बनविणारे असेल तर मूळ जनुकाने असे भाकित...
|
महाराष्ट्राची महती गाणारी अनेक गाणी आहेत; सुवर्णमहोत्सवाच्या या वर्षात आपल्या राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला जाईलच. मात्र या सार्या बिरुदांमध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची उपाधी म्हणजे, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून मानले गेलेले आहे. सामाजिक उन्नयनाच्या विविध बाबींकरता झटणार्या कार्यकर्त्यांच्या पिढ्यांमागून पिढ्या जि...
|
बाळ अगदी सुरुवातीला 'आई', 'बाबा' शब्द शिकते, पण त्यानंतर खूपच लवकर "नाही!" हा शब्द शिकते. दीड-दोन वर्षांच्या वयात "नाही-नको" हे शब्द वापरून बाळ पालकांना किती प्रभावीरीत्या बेजार करते, त्याची वैयक्तिक आठवण नसली, तरी असा प्रसंग आपणा सर्वांच्या समोर जरूर घडलेला असतो. इतक्या जुन्या ओळखीचा हा "नाही" शब्द आहे...
|
बहुभाषिक वस्तुस्थिती भारताच्या प्रत्येक मोठ्या शहराला लागू आहे - मुंबईसारखे महानगर असो, हैदराबाद सारखे ऐतिहासिक शहर असो, वा अलीकडे स्थलांतराने झपाट्याने बदलत जाणारी पुणे-बंगलोर ही शहरे असोत. भारतीय शहरी जीवन म्हणजेच एका दृष्टीने बहुभाषिक जीवन. असे असले तरी, प्रत्येक शहरातील भाषिक देवाण-घेवाण निराळी असते. त्या शहराच्या विशिष्ट
|
घरी भीमसेन जोशींच्या अभंगांच्या पलिकडे फार काही संगीत नसायचे. तिसरी-चौथीत शाळेतल्या एका बाईंकडे काही दिवस पेटी शिकायला गेलो होतो. मग सातवी-आठवीत असतांना शेजारी रहाणार्या एका दादामुळे हिंदी सिनेमातील गाणी ऐकायची सवय लागली. या शिवाय संगीताशी फार काही संबंध तिशीपर्यंत आला नाही. सर्व प्रकारची गाणी ऐकणे सुरु असायचे, पण
|
|
|
रोजगार, वीज, पाणी, रस्ते, यासारख्या मूलभूत गरजा भागविणार्या सोई-सुविधांची रेलचेल शहरी भागातच असल्यामुळे शहरीकरण अनिवार्य होत आहे. काही मूठभर शेतकरी व शेतमजूर सोडल्यास खेड्यातील लोंढेच्या लोंढे शहरात वस्त्या करत आहेत. खेडी ओस पडत आहेत. असे असले तरी शेतजमिनींचे मालक स्वत:च्या जमिनीला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा या प्रयत्नात असतात. एखादा शासन...
|
लघुसारांश : शारीर लक्षणांच्या वाटेल त्या संचालाच आपण व्याधी म्हणत नाही. पण मग कुठल्या एकत्रित संचाला एकच व्याधी असल्याचे ठरवतो? याबद्दल स्पष्ट निकष वैद्यकात सर्वमान्य नाहीत. लक्षणांच्या मार्फत काय कारणनिदान आणि उपचार करायचे आहेत? त्याबाबत वेगवेगळ्या व्यावहारिक उपयुक्तता मनात आणून आपण लक्षणसंच जोखू शकतो. उपयुक्ततेप्रमाणे हे निकष वेगवेगळे आहेत....
|
कापड, भांडी, कागद वगैरे साध्या गोष्टींपासून ते फ्रिज, टीव्ही, काँप्यूटर वगैरेपर्यंत घरात, ऑफिसात किंवा दुकानात आजकाल दिसणार्या बहुतांश वस्तू निरनिराळ्या यंत्रांद्वारे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या असतात. त्या कारखान्यांमधली ही यंत्रे कशा प्रकारची असतात, ती कशी चालतात, वगैरेंबद्दल सर्वसामान्य माणसांना काही कल्पना नसते. त्याच्याही पलीकडे जाऊन...
|
गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज भारता...
|
मखि भखि फखि धखि णखि ञखि
ङखि हस्झ स्ककि किष्ग श्घकि किध्व ।
घ्लकि किग्र हक्य धकि किच
स्ग श्झ ङ्व क्ल प्त फ छ कालर्धज्या ॥
आर्यभटीयातील हे बारावे कडवे.
|
चांगली आठवडाभर सुट्टी काढून फिरायला जाणार कुठे तर भूतानला! हे सांगितल्यावर मिळणार्या प्रतिक्रिया फारच मजेशीर होत्या. एकतर आधी भूतान हा वेगळा देश आहे हेच अनेकांच्या गावी नव्हतं. त्यात ते कुठे आहे, तिथे बघायला काय आहे वगैरेची माहिती असणं तसं दुर्मिळ होतं. काहींनी भूतान ऐकलं होतं मात्र ते शहर आहे, राज्य आहे की देश याबद्दल ते साशंक होते. काहींच्य...
|
सुमारे ३२०० वर्षांपूर्वी डार्डनेल्स सामुद्रधुनीच्या प्रदेशात ट्रॉय नावाचे एक शहर होते. तिथला राजा होता प्रायम आणि शहरातले रहिवासी नागरिक शेती, व्यापार, मासेमारी अशा व्यवसायांवर सुखी जीवन जगत होते. ग्रीक देवांना त्यांचे हे सुखी आयुष्य पाहून मत्सर वाटते असे आणि म्हणून शहर उद्ध्वस्त करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.
|
कोण ही झांतपी अन कोण ही यशोधरा? पुरुषप्रधान संस्कृती आणि इतिहासाच्या बुरख्याआड हरवलेल्या दोघीजणी! आणखी अशा कितीतरी असतील ज्यांनी आपल्या कर्तबगार पतीसाठी मोठे त्याग केले आणि त्याची नोंदसुद्दा कुठे नाही. झांतपी तरी दूर अथेन्स नगरीतील "सॉक्रेटीस" नावाच्या तत्त्ववेत्त्याची बायको आणि त्याच्या तीन पोरांची आई. पण यशोधरा ('यशोदा' नव्हे!) ही तर भगवान गौ...
|
स्कॉटलंडच्या औटर हेब्रिडीज द्वीपांचा रहिवासी कॉलिन मकेंझी १७८३ साली वयाच्या २९व्या वर्षी इंडिया कंपनीच्या लष्करात नोकरी पत्करून भारतात आला. मकेंझीच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण खाते कंपनी सरकाराच्या विस्ताराचे आणि स्थिरावण्याचे प्रबळ साधन बनले. नकाशाशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, आणि बारीक भौगोलिक-लष्करी ज्ञान यांचे विलक्षण मिश्रण असलेल्या आधुन...
|
पृथ्वीतलावरील सर्वात स्वार्थी प्राणी निर्विवादपणे मानव आहे. हे बहुधा आपल्या विचारांमधे आपल्या जनुकांकडुन (genes) आले असावे. आपल्या जीन्स स्वार्थी असल्यानेच आपण निसर्गात टिकलो, विविध परिस्थितींमधे जगायला व फोफावायला शिकलो. या स्वार्थाचे केंद्र नेमके काय आहे व त्याचा परीघ किती आहे याचा थांग लागणे तसे कठीण, पण धार्मिक, प्रादेशिक व त्यामुळे राजकीय...
|
वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन...
|
पहिल्या महायुद्धानंतर जे अनेक कलाकार सँटा फे परिसराकडे वळले, त्यांच्यात जॉर्जिया ओ'कीफ आणि अल्फ्रेड स्टिगलिझ ह्या दांपत्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
|
१९३३ साली बेल लॅब्जमधे कार्ल जान्स्की या अभियंत्याकडे रेडीओ खगोलशास्त्राची सुरूवात करण्याचे श्रेय जाते. बेल लॅब्जमधे रेडीओ लहरी वापरून दळणवळणाची साधने विकसित करण्याचे काम सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून जान्स्कीला एक प्रकल्प दिला होता तो म्हणजे रेडीओ लहरींमधला नॉइज(?) आणि त्याचे स्रोत यांची माहिती गोळा...
|
प्रमोद सहस्रबुद्धे, य. ना. वालावलकर
१. बुद्धीबळपटावर वजीर - प्रमोद सहस्रबुद्धे
२. बेरीज शंभर,गुणाकार अधिकतम - य. ना. वालावलकर
३. तर्कदोष शोधा -प्रमोद सहस्रबुद्धे
|
काहीतरी'च' काय? - धनंजय वैद्य
तुम्हाला हे ठाऊक आहे का? - मन
|
दिवाळी जवळ आली की बाजारात विविध आकाराचे छान छान कलात्मक आकाशकंदील बघायला मिळतात. बाजारपेठ ह्या विविध आकारांच्या आकाशकंदीलांनी उजळून निघते. पण आकाशकंदील म्हटले की डोळ्यांसमोर येतो, तो चांदणीचाच आकार. मग त्यात पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी...
|
|