ट्रॅव्हल्स

भाग २

कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्याची एक कादंबरी सिनेमासाठी बर्‍याच मोठया किमतीला विकली जाऊन तो एकदम प्रसिद्ध झाला. त्या वेळचे त्याचे लोकांच्या अचानक बदललेल्या वागणुकीबद्दलचे भाष्य, असे अचानक वैद्यक सोडून वेगळे आयुष्य जगायच्या घेतलेल्या निर्णयाबद्दलचे भाष्य, त्याला एक जीवनाबद्दलची आगळीच सखोल जाणीव होती हेच दर्शवते.

बायकोच्या आग्रहास्तव तो एका सायकिऍट्रिस्ट कडेही गेला पण तरीही शेवटी त्याचा घटस्फोट झालाच. मात्र त्यानंतरही तो सायक्रिऍट्रिस्टकडे जात राहिलाच, आणि त्याला असे जाणवले की तो स्वत:च स्वत:ला पूर्णतया ओळखू शकत नव्हता. त्यासाठी त्याला दुसर्‍या कोणाचीतरी गरज भासत होती. खरे तर क्रायटनची प्रतिभा तर अभूतपूर्व होतीच पण त्याची बुद्धीमत्ता आणि मानवी व्यवहारासंबंधीची जाणीवही विलक्षण होती. त्याने लिहिलेल्या पुस्तकांवरूनच हे सहजगत्या सिद्धही होतेच. आणि तरीही स्वतःला जाणवलेल्या स्वतःतील त्रुटी, स्वतःचीच स्वतःविषयीचीही रोखठोक मते मांडणे हे सोपे काम नाही.

मेडिकलला असतानाच क्रायटनचे पहिले लग्न झालेले होते. तो आणि त्याची बायको वेगवेगळ्या ठिकाणी शिकत होते. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या झाल्याने दोघे विभक्त झाले आणि क्रायटन काही दिवस हॉलिवूडमध्ये राहिला. तिथलेही काही प्रसंग नर्मविनोदी शैलीत त्याने वर्णन केले आहेत. विशेषत: त्याच्या नावासमोर एम डी ही डिग्री लावल्याने होणारे गोंधळही त्याने मजेशीर रीत्या रंगवून सांगितले आहेत. बायकोच्या आग्रहास्तव तो एका सायकिऍट्रिस्ट कडेही गेला पण तरीही शेवटी त्याचा घटस्फोट झालाच. मात्र त्यानंतरही तो सायक्रिऍट्रिस्टकडे जात राहिलाच, आणि त्याला असे जाणवले की तो स्वत:च स्वत:ला पूर्णतया ओळखू शकत नव्हता. त्यासाठी त्याला दुसर्‍या कोणाचीतरी गरज भासत होती. खरे तर क्रायटनची प्रतिभा तर अभूतपूर्व होतीच पण त्याची बुद्धीमत्ता आणि मानवी व्यवहारासंबंधीची जाणीवही विलक्षण होती. त्याने लिहिलेल्या पुस्तकांवरूनच हे सहजगत्या सिद्धही होतेच. आणि तरीही स्वतःला जाणवलेल्या स्वतःतील त्रुटी, स्वतःचीच स्वतःविषयीचीही रोखठोक मते मांडणे हे सोपे काम नाही.

सिनेमाविश्वाबद्दल अनेक गोष्टी सांगताना त्याला जाणवलेली एक महत्त्वाची बाबही त्याने नमूद केली आहे : ती अशी की या धंद्यातले सगळे जण सदैव खोटे बोलत. ते का व कशासाठी हे क्रायटनला काही कळत नसे. शिवाय जोराजोराने बोलून आरडाओरडा केल्याशिवाय ते बोलणे समोरच्याच्या मनावर ठसत नसे. या आणि इतरही अनेक बाबतीत हॉलीवूड आणि हार्वर्ड अगदीच विरुद्ध होते, असे त्याचे निरीक्षण आहे. त्याच्याच शब्दात सांगायचे तर हॉलिवूडचे वातावरण ’एक्झॉटिक’ होते. ड्रग घेणारी, होमोसेक्शुअल अशी विविध तर्‍हेची माणसे तिथे होती. या सगळ्याचे एक विचित्र असे आकर्षण वाटत असले तरी त्याला तिथे बरेचदा "कसेनुसे" (अन-इझी) वाटायचे. अशाच एका फेमस सेक्स सिम्बॉल असलेल्या मुलीने, क्रायटन त्या वेळी फिरत होता. तिने त्याला एका सायकिक (अतिंद्रिय शास्त्राधारे काही गोष्टी सांगणार्‍या, भविष्य वर्तवणार्‍या) बद्दल सांगितले. तिथे हॉलीवूडमध्ये सायकिक्स, ज्योतिष, रास याबद्दल सततच चर्चा चालू असायची. क्रायटनला "तुझी साइन काय ?" असे कोणी विचारले तर तो गमतीने "निऑन" असे सांगत असे. मात्र एक नवीन अनुभव म्हणून तो त्या सायकिक बाईकडे जाऊन आला व तिने सांगितलेल्या काही गोष्टी, ज्या खरे तर तिला माहित असणे अशक्य होते, त्या अगदी अनपेक्षित रीत्या खर्‍या ठरल्या.

त्याच सुमारास त्याने दिग्दर्शित केलेला, अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात बनवलेला एक सिनेमा चांगलाच गाजला. पण एकाएकी क्रायटनला असे वाटू लागले की आतापर्यंत त्याच्यासमोर अगदी सरळ स्वच्छ अशी ध्येये होती. तो फक्त ३० वर्षांचा होता, हार्वर्ड ग्रॅजुएट, केम्ब्रिजमध्ये शिकवून आलेला, पिरॅमिड चढून आलेला, डॉक्टर, लग्न झालेले आणि घटस्फोटसुद्धा, सॉल्क इन्स्टिटयुटमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो, २ बेस्ट सेलिंग कादंबर्‍यांचा लेखक आणि आता एका गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक झाला होता. पण मग आता पुढे काय ? यापुढे काय करायचे या विचारानेच त्याला नैराश्य आले. मग असंख्य पुस्तके वाचता वाचता त्याला " बी हीयर नॉऊ " हे राम दास यांचे पुस्तक मिळाले. हे राम दास म्हणजे पूर्वाश्रमीचे " रिचर्ड अल्पर्ट", हार्वर्डमधील सायकॉलॉजीचे प्रोफेसर. त्यांची हार्वर्डने विद्यार्थ्यांना अमली पदार्थ दिल्याबद्दल हकालपट्टी केली होती. ते पुस्तक वाचता वाचता कृष्णमूर्ती, योगानंद यांचीही बरीच पुस्तके त्याने वाचली. आणि मग विविध ठिकाणी प्रवास करून जगाचा अनुभव घ्यायचे ठरवले.

एकाएकी क्रायटनला असे वाटू लागले की आतापर्यंत त्याच्यासमोर अगदी सरळ स्वच्छ अशी ध्येये होती. तो फक्त ३० वर्षांचा होता, हार्वर्ड ग्रॅजुएट, केम्ब्रिजमध्ये शिकवून आलेला, पिरॅमिड चढून आलेला, डॉक्टर, लग्न झालेले आणि घटस्फोटसुद्धा, सॉल्क इन्स्टिटयुटमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो, २ बेस्ट सेलिंग कादंबर्‍यांचा लेखक आणि आता एका गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक झाला होता. पण मग आता पुढे काय ? यापुढे काय करायचे या विचारानेच त्याला नैराश्य आले.

त्यानंतर या पुस्तकात त्याने केलेल्या प्रवासाची आणि प्रवासाच्या प्रदेशात किंवा इतरत्रही घेतलेल्या विविध अनुभवांची वर्णने आहेत. पण हे पुस्तक म्हणजे नुसते प्रवासवर्णन नाही. किंबहुना यातले प्रवासवर्णन हे भौगोलिक प्रवासवर्णन नसून विविध माणसे, त्यांच्या भावना, जीवनाचा अनुभव याचे अतिशय प्रामाणिक वर्णन आहे.

या आधी १९६५ मध्ये एक फेलोशिप मिळून क्रायटनने युरोप व नॉर्थ आफ्रिका असा प्रवास केला होता. त्यामुळे त्याला प्रवासाची चांगलीच सवय होती. पण तरीही परत नव्याने प्रवास करताना हाँगकाँगमध्ये डुकरांची आतडी, माशांची पिटपिटणारी हृदये अशी काही दृश्ये बघून त्याला भलताच त्रास झाला. तिथल्या चित्रविचित्र पद्धती बघून मौजही वाटली. बॅंकॉकची ट्रिप तो का व कशी आवरती घेतो हे ही पुस्तकामधूनच वाचायलाच हवे. याचा समारोप करताना त्याने म्हटले आहे की त्याला वाटत होते की तो एक सराईत प्रवासी आहे, पण तिथे त्याला कळून चुकले की खरोखर त्याचे मन त्याच्या सांस्कृतिक कल्पनांनी बद्ध आहे आणि अजून त्याने बरेचसे जग पाहिलेलेच नाही.

मलेशियात जाऊन तिथल्या " तमान नगारा" या जंगलाला भेट द्यायचे तो ठरवतो. तिथे माशांनी पूर्ण अंग भरून गेल्याचा अनुभव, न दिसलेली जनावरे, असे सगळे अनुभवून त्याच्या लक्षात येते की तो स्वतः भोवतालचे जग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. तो एक शहरी, तंत्रज्ञान वापरणारा माणूस आहे. त्याला असे शिकवले गेले आहे की त्याने गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत आणि सतत धडपड केली पाहिजे. पण मलेशियातील हा आठवडा अशा घटनांनी भरलेला होता की त्याचा त्यावर काहीही अधिकार चालत नव्हता. त्या घटनांनी जणू त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून दिली. पुढे आफ्रिकेत हत्तीच्या हल्ल्याचे वर्णन करतानाचे त्याचे भाष्यही फार सखोल आहे. तो म्हणतो की जो पर्यंत आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत तोपर्यंत विविध शक्यतांचा विचार करून आपण अतिशय घाबरून जातो. पण एकदा का उत्तर मिळाले किंवा ते उत्तर ऐकण्याची आपण मानसिक तयारी ठेवली की मग ती भीती, तो हिस्टेरिया आपोआप नष्ट होतो. आपल्याला वाटते आपण बघायला घाबरत आहोत, पण खरोखर ते न बघणेच आपल्याला घाबरवत असते. जेव्हा आपण खरोखर बघतो त्या क्षणाला आपली भिती जाते.

दहा वर्षांचा डायव्हिंगचा अनुभव गाठीशी असतानाही बहिणीबरोबर केलेल्या डायव्हिंगमधे आलेल्या अनपेक्षित अडचणी, एका मैत्रीणीबरोबर किलिमांजारो हा १८००० फूट उंचीचा विषुववृत्ताजवळचा विझलेला ज्वालामुखी चढून जाणे, समुद्रकिनारी येऊन अंडी घालणार्‍या नामशेष होत चाललेल्या एका कासवांच्या प्रजातीतील मादीला बघायला जाणे, डायव्हिंग मधे भरपूर शार्क दिसणे, डायक नावाच्या हेड हंटरना बघायला जाणे, शांग्रिलाची ट्रिप असले सगळे वैविध्यपूर्ण प्रसंग आणि अनुभव रंगवून सांगताना त्याचबरोबर माणसाचे मन, त्याचे कार्य, निद्रिस्त मनाची शक्ती आणि स्वत:च केलेले स्वत:चे मूल्यमापन हे अतिशय वाचनीय तर ठरतेच पण विचारप्रवर्तकही ठरते.

मधेच क्रायटनने त्याच्या वडिलांच्या मृत्यूविषयी लिहिले आहे. मुळात आधी त्याचे त्याच्या वडिलांशी तितकेसे पटत नसे. त्यात तो सुट्टीवर असताना वडील गेल्याचा फोन आला, तेव्हा मनातील पहिली भावना रागाची, त्यांनी त्याची सुट्टी खराब केल्याची अशीच होती. आपल्या भारतीय संस्कारी मनाला हे थोडेसे चमत्कारीक वाटले, तरी ज्या प्रामाणिकपणे त्याने हे सर्व लिहिले आहे ते लक्षात घ्यायला हवे. पण त्याचबरोबर घरी गेल्यावर मनात उठलेला विविध भावनांचा कल्लोळही त्याने सामर्थ्याने चित्रित केला आहे. वडिलांचा मृतदेह बघायला गेल्यावर त्याला ते अजूनही तिथेच आहेत अशी काहीशी चमत्कारीक भावना जाणवली. आतापर्यंत बर्‍याच लोकांनी असला अनुभव सांगितलेला त्याने वाचलेले-ऐकलेले होते, पण त्याचा स्वत:चा त्यावर अजिबात विश्वास नव्हता. पण तरीही फक्त त्यालाच ते तसे जाणवले. मात्र दुसर्‍या दिवशी दफनविधी (फ्युनरल) होता तेव्हा मात्र त्याला तसे काहीच जाणवले नाही.

क्रायटन हा "ग्रेट ट्रेन रॉबरी" चा दिग्दर्शक होता. तिथले वर्णन गमतीशीर आणि उदबोधक असे एकाच वेळी आहे. या सिनेमाचे शूटींग हे इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये होते. प्रोडयुसर आणि स्टंट ऑफिसर सोडून त्याच्या फारसे ओळखीच कोणी नव्हते. त्याला असे कळले की इंग्लंडमध्ये डायरेक्टरला " गव्हर्नर" किंवा " गव्ह" म्हणतात. पण त्याला कोणीच काही म्हणे ना, अगदी "सर" देखील नाही. आणि अगदी मुळापासूनच काहीतरी विरोधाला सुरुवात झालेली त्याला जाणवले. अमेरिकेत जो क्रायटन "अबोल, मितभाषी, तुटक" समजला जात असे, तो इंग्लंडमध्ये अगदी विचित्र तर्‍हेने अती उत्साही असलेला ठरला. इतका की त्याचा असिस्टंट डायरेक्टर हा अगदी अपमानास्पद ठरावी अशी उघड उघड टीका त्याच्यावर करत असे आणि त्याने अखेरशेवटी क्रायटन काही ड्रग्स घेतो आहे का? असे स्पष्टच विचारले. वरून सर्वांनाच तसे वाटते असेही सांगितले. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत गेली. शेवटी प्रोडयुसरने त्याला सांगितले की या स्टाफला तुझ्या आधीच्या फिल्म्स दाखव. त्या तिथे आणण्यात काही अडचणी असल्याने विलंब होत होता. अखेरशेवटी कोमाची एक प्रिंट येउन ती स्टाफला दाखवल्यावर आधीचे चित्र एकाएकी पालटून गेले. या शूटिंगच्या वेळी केलेले शॉन कॉनरीच्या स्वभावाचे प्रामाणिक वर्णन, ट्रेनचे चित्तथरारक शूटींग हे सगळे क्रायटनच्या ताकदवान शब्दांतून वाचायलाच हवे.

ग्रेट ट्रेन रॉबरीचे शूटिंग, त्यातली कॉनरीची विस्मयकारक कामगिरी असल्या क्रायटनच्या व्यवसायातील मनोरंजक भागाच्या चित्रणानंतर अचानक समोर येते ते लंडन सायकिक्सचे वर्णन. क्रायटनचा या बाबींवर अगदी खूप विश्वास होता असेही नाही पण त्याला विविध अनुभव घेऊन त्यातल्या सत्यासत्यतेची शहानिशा करून घ्यायची ओढ होती. म्हणून तो स्पिरिच्युअल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन मध्ये जाऊ लागला. तिथे दारातच सर आर्थर कॉनन डॉयल ची खुर्ची ठेवलेली होती. ते त्या संस्थेचे सुप्रसिध्द सभासद होते. शेरलॉक होम्सचे जनक आणि स्वत: डॉक्टर ( फिजीशीयन ) अशा शास्त्रीय वातावरणातून आलेल्या सर डॉयलना या सगळ्या गोष्टीत विशेष रस होता. त्यांच्या परीने त्यांनी असल्या सुपरनॅचरल प्रसंगांची शहानिशाही केली होती आणि पर्‍यांवर ( फेअरी ) आपला विश्वास आहे असे जाहीरही केले होते. म्हणूनच क्रायटनला अशा गोष्टी खूप काळजीपूर्वक हाताळायच्या होत्या. त्यासाठी तो बरेच नियमही पाळे. खरे नाव द्यायचे नाही, बोलताना संदर्भ द्यायचे नाहीत, चेहर्‍यावरून, शरीरावरून काही दर्शवू द्यायचे नाही, मन रिकामे ठेवायचे, इत्यादी इत्यादी. त्यातल्या काहींनी ओळखलेल्या गोष्टी अगदी खर्‍या आल्या, त्यांना काहीही माहित नसतानाही, अगदी बिनचूक. पण काहींच्या सपशेल चूकही ठरल्या. बर्‍याच वेळा तिथे गेल्यावर क्रायटनला त्याच्या ड्रायव्हरने एकदा विचारले की, "तिथे नक्की काय करतात. भविष्य सांगतात का ?" क्रायटन म्हणाला, "कधी कधी सांगतात, नाहीतर कधी कधी नुसतेच तुमच्याबद्दल सांगतात, तुम्ही कसे आहात, तुमची स्वभाववैशिष्ट्ये इत्यादी". त्यावर त्या ड्रायव्हरने पटकन विचारले, "तुम्ही कसे आहात हे तुमचे तुम्हाला आधीच माहित नाही का ?" असल्या वर्णनामधून क्रायटनच्या फर्मास वर्णनशैलीबरोबर त्याच्या स्वभावातली प्रामाणिक बाजूही उठून दिसते, अखेरशेवटी ड्रायव्हरचे कुतूहल शमवायला तो त्यालाही एकदा अपॉइंटमेंट घेऊन देतो. हे सगळे वर्णन लिहिताना माणसाच्या मनातील प्रायव्हसी, भीती, सायकिकची वागणूक या सर्वांवरचे त्याचे भाष्य अगदी सखोल आहे. आणि ही असली भाष्ये त्याच्या लेखणीतून किचकट होऊन येत नाहीत तर दुसर्‍या प्रसंगाच्या वर्णनातून अगदी हसत खेळत येतात.

 

पुढे: पृष्ठ ३