ऋणनिर्देश
अंक निर्मितीच्या विविध पातळ्यांवर सहकार्य देणार्या खालील सुहृदांचे विशेष आभारी आहोत.
संकेतस्थळबांधणी, अंकबांधणी आणि सजावट:
चित्तरंजन भट, शशांक जोशी, आजानुकर्ण
मुद्रितशोधन:
आजानुकर्ण, नंदन होडावडेकर, प्रियाली
छायाचित्रे संकलन:
आर्य चाणक्य, शरद हर्डीकर
मुखपृष्ठ:
ध्रुव, चित्तरंजन भट, शरद हर्डीकर
उपक्रम दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणार्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
संपादकीय
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाजालावर मायमराठीने पाऊल ठेवून आज अनेक वर्षे झाली. विविध संकेतस्थळे, अनुदिन्या, वर्तमानपत्रांच्या जालआवृत्त्या वगैरेंच्या रुपांतून मराठीने जालावर चांगलेच मूळ धरले आहे. आपल्या लेकरांनी दाखवलेल्या या नव्या जगात मोठ्या आत्मविश्वासाने तिची वाटचाल चालू आहे.
पुस्तक परिचय- फलज्योतिष शास्त्र की अंधश्रद्धा?
पाश्चात्य जगतात गेल्या ३०-४० वर्षांत फलज्योतिषावर जे प्रचंड संशोधन झाले, त्याची फारच थोडी कल्पना मराठी वाचकांना असेल. ती कल्पना त्यांना यावी आणि या वादग्रस्त विषयाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन कसा आहे हेही त्यांना समजावे, या उद्देशाने हा अनुवाद यशोदा भागवत यांनी करून मराठी भाषेच्या शास्त्रीय विभागात फार मोलाची भर घातली आहे. अशा प्रकारची शास्त्रविषयक पुस्तके मराठीत फारच थोडी आहेत.
पृष्ठ १