फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी

प्रकाश घाटपांडे

फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा सहभाग होता.

 
पृष्ठ १


विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यात फरक काय? (उंबेर्तो एको यांचे मत)

धनंजय

आपल्या अनुभवविश्वात असंख्य तपशील असतात. त्या सर्वांची काही व्यवस्था लावायची उर्मी आपणा सर्वांत असते. खरे तर अशी काही व्यवस्था लावली नाही, तर आपण किंकर्तव्यविमूढ होऊ. या व्यवस्थेची उदाहरणे बघितलीत तर लोक दुहेरी वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ भौतिकीत एकीकडे न्यूटनचे कायदे तर दुसरीकडे ऍरिस्टॉटलचे विवेचन, संस्कृत भाषेच्या अभ्यासात एकीकडे पाणिनीचे नियम तर दुसरीकडे भर्तृहरीचे वाक्यपदीय, समाजातल्या वागणुकीबद्दल एकीकडे कायद्याकानूंचा उहापोह तर दुसरीकडे नीतिशास्त्र.

रंग आणि संगीत

किरण देशपांडे

पृष्ठ २

तुम्हाला रंग बदलणारा शेमेलियन (chameleon) सरडा कदाचित माहीत असेल. 'रंग' हेसुद्धा या सरड्याप्रमाणे स्वत:चे रंग बदलतात! ही अतिशयोक्ती नाही. तुम्ही कपड्याच्या दुकानात नवा शर्ट घ्यायला जाता तेव्हा १० वेळा शर्टाचा रंग तपासून घेता (खरंतर बायकांच्या साडीखरेदीचे उदाहरण जास्त योग्य आहे). आणि तोच रंग घरातल्या प्रकाशात पाहिला तर वेगळा दिसतो, सूर्यास्ताच्या उजेडात अजून थोडा वेगळा दिसतो. इतकेच काय, पण रंगाची पार्श्वभूमी (background) बदलली तरी रंग एकदम वेगळा दिसू शकतो. उदा. खालील आकृती पहा.


रंग आणि संगीत

किरण देशपांडे

रंगाचा किंवा संगीताचा साक्षात्कार कोणत्या क्षणी कसा होईल हे सांगता येत नाही. एखादा नारिंगी सूर्यास्त पाहताना, एखाद्या पक्ष्याचे गाणे ऐकताना, चित्रकाराचे चित्र पाहताना किंवा जगजीत सिंगची सुंदर गझल ऐकताना! अशी कल्पना करा की तुमचा एखादा दिवस खूप वाईट गेलाय (बॉसने 'दम' भरल्यामुळे म्हणा किंवा ऑफिसमध्ये तुमचा 'पोपट' झाल्यामुळे). संध्याकाळी निराश मूडमध्ये घरी आल्यावर जर तुम्हाला फ्लॉवरपॉटमध्ये टवटवीत गुलाबाची फुले दिसली किंवा टीव्हीवर तुमचे सर्वात आवडते गाणे लागले असले, तर तुमचा चेहरा लगेच खुलतो. आणि मग स्वारी एकदम 'रंगात' येते.

पुस्तक परिचय- फलज्योतिष शास्त्र की अंधश्रद्धा?

प्रकाश घाटपांडे

पृष्ठ २

डॉ. वि.म.दांडेकर यांनी या पुस्तकाचे केलेले परीक्षण अनुवादाच्या आधी टाकलेले आहे ते प्रथम वाचून मग अनुवाद वाचणे बरे. दांडेकरांचे मत असे: 'फलज्योतिष हे शास्त्र आहे असे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी ते शास्त्र नाही असेही अद्याप कोणी सिद्ध केलेले नाही!` -- म्हणजे पुन: तोच गुळमुळीतपणा! गेली दोन-अडीच हजार वर्षे भरभराटीत असलेले हे प्रकरण अद्यापही शास्त्र म्हणून सिद्ध झालेलेच नाही म्हणे! मग आता इथून पुढे ते शास्त्र 'आहे` असे सिद्ध करायला कोणी अवतार घेणार आहे का? असा प्रश्न मनात येतोच. पण ग्यानबाची मेख इथेच तर आहे!


बोली भाषेला जपले पाहिजे!

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे

प्रमाणभाषा आणि बोली हे एकमेकांच्या साह्याने प्रवास करणारे भाषिक आविष्कार आहेत. समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे, म्हणून त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी प्रमाणभाषेपासून बोलीला वेगळे करता येणार नाही. समाजातील लोक आतल्या आत वेगवेगळे गट करून राहत असतात त्याची कारणे सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, जातीय, अशी कोणतीही असल्यामुळे त्यांची स्वतःची गटापुरती एक भाषा तयार होते. ही भाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते म्हणून त्या भाषेला बोलीभाषा म्हटले जाते.

 


ठरलं म्हणजे ठरलं!

आर्य चाणक्य

ठरलं म्हणजे ठरलं, वचन म्हणजे वचन (a promise is a promise ) !! ऑटोएक्स्पो २००८ या भारतातील वाहन आणि वाहन व्यवहार संबंधीत महामेळाव्यात एक लाखाची नॅनो जगासमोर सादर करताना, रतन टाटांनी काढलेले हे उद्गार आहेत. नॅनो बद्दल बरेच काही, लिहून बोलून झाले आहे. नॅनो हे रतन टाटांनी सत्यात आणलेले वाहन क्षेत्रातले दुसरे स्वप्न. पहिले कोणते?

 


रतन टाटा


इराटोस्थेनिस आणि पृथ्वीचा परीघ

विनायक

आधुनिक खगोलशास्त्राची सुरुवात कोपर्निकस (इ.स. १४७३ - १५४३) या पोलिश खगोलशास्त्रज्ञाने मांडलेल्या स्थिर सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे पृथ्वीसह इतर ग्रह अशा "सूर्यकेंद्री विश्व" या मॉडेलपासून होते असे बहुतेक लोक मानतात. कोपर्निकसपूर्वी पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो इतकेच नव्हे तर पृथ्वी स्थिर असून सर्व विश्व (ग्रह - तारे) तिच्याभोवती फिरते अशा अज्ञानमूलक, भ्रामक, कल्पनाच रूढ होत्या याबद्दल सर्वांचे एकमत दिसते. खगोलशास्त्राच्या इतिहासाचा आढावा घेतला तर वस्तुस्थिती बरीच वेगळी असल्याचे लक्षात येते.