कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास

राधिका

एकाच साहित्यकृतीचे दोन अनुवाद पाहिले की वाटते, त्यांत फरक असून असून कितीसा असणार? शेवटी आशय तर एकच आहे, तो आशय एकाच भाषेत लिहून लिहून किती वेगवेगळ्या शब्दांत लिहिणार? परंतु वास्तव परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शवते. उदाहरणार्थ, मेघदूताचे सर्वच मराठी अनुवाद वैविध्यपूर्ण आहेत. सी. डी. देशमुखांचा अनुवाद समछंदी आहे तर वसंत बापटांचा मुक्तछंदात आहे. कुसुमाग्रजांचा अनुवाद १९५६ सालचा आहे तर शांताबाईंचा अनुवाद १९९४चा.

नातवाच्या जगात (भाग १: मोबाईल)

ऋषिकेश

"हे बघा आजोबा, इथे जे बटण असतं ना त्याने मोबाईल चालू करता येतो. आणि तेच बटण दाबलं की बंद! "
बेट्याने अगदी बेसिकपासून सुरवात केली.
"फोन चालू असला तर तो जनरली लॉक असतो त्याला अन्लॉक करायचा"
"ते कसं? " मलाही हा प्रश्न होता पण नातवाला कसं विचारायचं... हिने विचारलं ते बरं केलं
"आधी हे डावीकडचं कोपर्‍यातलं बटण दबायचं आणि मग लगेच "*". प्रत्येक कंपनीच्या मोबाईलमध्ये अन्लॉक करायची वेगळी स्टाईल असते. या सेटमध्ये असा करायचा. "

 


एक डॉलरचे रहस्य

प्रियाली

पृष्ठ २


एक डॉलरचे रहस्य

प्रियाली

एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानाचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसऱ्या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसते. हे पिरॅमिडही पूर्ण नाही. मध्येच कापलेले आहे. त्याच्या शिखरावरील भागात एक प्रकाशमान डोळा असून पायथ्याशी रोमन आकडे दिसतात. पिरॅमिडच्या वर आणि खाली लॅटीन भाषेतील मजकूर आहे.

 
पृष्ठ १


घराजवळ आलेले महाजाल

देविदास देशपांडे

युनिकोडच्या प्रसारामुळे महाजालाची व्याप्ती अनेकपटींनी वाढली हे मराठी आणि इंग्रजीतील ब्लॉग्जच्या वाढत्या संख्येवरून दिसून येतच आहे. मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत इंटरनेट वापरू इच्छिणार्‍या व्यक्तींना त्यामुळे खूपच फायदा झाला आहे. शिवाय केवळ यासाठी इंग्रजी शिकण्याची गरजही राहिली नाही. मात्र आता इंटरनेट येत आहे सर्वच लोकांच्या स्वतःच्या भाषेत. जागतिकीकरणाची ही दुसरी बाजू असून, जागतिकीकरणाला स्थानिक संदर्भांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची ही चुणूक आहे.

 


भगीरथाचे वारसदार

जयेश जोशी


सामुदायिक गायन वर्ग


भगीरथाचे वारसदार

जयेश जोशी

निसर्गाने सढळ हस्ताने दान दिलं असलं तरी विकासाच्या बाबतीत कोकण तसा मागासच राहिला. परंतु इथल्या लाल मातीत बहारदार शेती जरी फुलली नसली तरी परिस्थितीशी झगडून उत्तुंग उंची गाठणारी असंख्य नररत्ने मात्र जन्मास आली. ही कथा आहे अशाच एका नायकाची. मागील शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झालेली ही कथा या शतकामध्ये एका रोमहर्षक वळणावर येऊन ठेपली आहे.

 
पृष्ठ १


न्यू मेक्सिकोचे प्रवासवर्णन

नंदन होडावडेकर

पृष्ठ २

कुठे रहाल? - कार्ल्सबाड शहर (अंतर सुमारे ४० मैल)
विशेष सूचना - मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने गुहेत खाण्यापिण्याची, प्रसाधनगृहांची उत्तम व्यवस्था आहे. रेंजर गायडेड टूर्स लोकप्रिय असल्याने आगाऊ नोंदणी केल्यास उत्तम.