ध्यानम् सरणम् गच्छामी
भाग २
ताण-तणाव
ध्यानधारणेमुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो व असाधारण परिस्थितीचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते असा पुरस्कर्त्यांचा दावा असतो. इतरांच्या तुलनेत ध्यानोपासक जास्त खंबीरपणे परिस्थिती हाताळू शकतात यावर त्यांचा विश्वास असतो. ध्यानधारणेसाठीच म्हणून पगारी रजा देण्याची आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकार्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्र शासनाने रजा देण्यास अनुमती दर्शविली. जबाबदार पदावर काम करत असताना ताण वाढू नये, मनस्वास्थ्य लाभावे, मनाचा समतोल बिघडू नये, योग्य निर्णय घेता यावे व त्यासाठी विपश्यना या ध्यानधारणा मार्गाचा अंगीकार करावा अशीही शासनाची सूचनावजा आज्ञा होती.
ध्यानम् सरणम् गच्छामी
शहरी गोंगाटापासून लांब कुठेतरी एखाद्या खेडेगावातील वा थंड हवेच्या ठिकाणच्या वातावरणात आपल्या निवासाची व जेवणा-खाण्याची (चांगली!) सोय करण्यात येणार आहे व त्यासाठी एकही पैसा मोजावा लागणार नाही (परंतु शिबिराच्या शेवटच्या दिवशी थाळीत - लाजेकाजेस्तव का होईना - दान-देणगी टाकावीच लागते!) असे जाहीरपणे खरोखरच कुणी सांगत असल्यास...
विवेक वेलणकर - माहिती अधिकार चळवळीतील एक उपक्रमी - ३
भाग ३
११) माहिती आयुक्त पदाच्या निवडीसाठीचे निकष व प्रक्रिया पारदर्शी असा्वी यासाठी कृष्णराज राव यांनी केलेले उपोषणाला आपला पाठिंबा आहे काय? या पदासाठी निकष काय असावेत? माहिती उपायुक्त, सहाय्यक माहिती आयुक्त अशा पदांची निर्मिती होउन त्यांची संख्या वाढवली तर प्रलंबित माहिती प्रकरणांचा निपटारा लवकर होईल असे वाटते का?
विवेक वेलणकर - माहिती अधिकार चळवळीतील एक उपक्रमी - २
भाग २
६) माहिती अधिकाराचा वापर हा नोकरशहांना त्रासदायक वाटतो. केवळ आम्हाला त्रास देण्यासाठी याचा गैरवापर काही लोक करतात या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?
विवेक वेलणकर - माहिती अधिकार चळवळीतील एक उपक्रमी
माहिती अधिकार व विवेक वेलणकर यांचे एक अतूट नाते आहे. माहिती अधिकाराची चळवळ जनसामान्यात फोफावण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पुणे महानगरपालिका, महावितरण, बीएसएनएल या यंत्रणांची अनेक गुपिते त्यांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांत उघड केली. सजग नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे अभियंते आहेत.
भरवश्याची ऐशी तैशी!
गेल्या दोन तीन दशकाच्या जागतिक आर्थिक परिस्थितीवर ओझरती नजर टाकल्यास अर्थव्यवस्थेचे इंजिन वेगाने पुढे जाण्यासाठी एकमेकावरील भरवसा हा वंगणासारखा प्रत्येक ठिकाणी काम करत आहे असे दावे केले जात आहेत, हे लक्षात येईल. परस्परांच्या शब्दावरील विश्वास, नेटवर्किंग, घरबसल्या माहितीची देवाणघेवाण इत्यादींमुळे सर्व संबंधितांना त्याचा लाभ होत गेला. एखाद्याने दिलेला शब्द हा शंभर टक्के खात्रीशीर आहे या भरवश्याच्या पायावर मजलेच्या मजले बांधले गेले. परस्परावरील विश्वासामुळे बाजारव्यवस्थेला मिळणारे बळ व या विश्वासातून घडलेल्या चमत्काराचे गुणगान गाणारी शेकडो पुस्तकं बाजारात याच कालखंडात आली. (व रद्दीतही गेली!) विशेषज्ञ म्हणवून घेतलेल्यांनी विश्वासातून मिळणार्या फायद्यावर ढीगच्या ढीग संशोधनपर निबंध लिहिले. व्यवस्थापन कौशल्य, विश्वासार्ह नैपुण्य, प्रगतीचा वाढत चाललेला चढता आलेख, डोळे दिपवून टाकणारे नेटवर्किंग इत्यादींनी ही किमया केली असे तथाकथित तज्ञ ऊर बडवत सांगत सुटले.
छायाचित्र - फुलपाखरू
अभिजित धर्माधिकारी
संकेतस्थळः http://www.abhijitsplanet.com