चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती!
दिवाळी जवळ आली की बाजारात विविध आकाराचे छान छान कलात्मक आकाशकंदील बघायला मिळतात. बाजारपेठ ह्या विविध आकारांच्या आकाशकंदीलांनी उजळून निघते. पण आकाशकंदील म्हटले की डोळ्यांसमोर येतो, तो चांदणीचाच आकार. मग त्यात पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी...
ढीगभर लक्षणे, की एकसंध व्याधी? - १
लघुसारांश : शारीर लक्षणांच्या वाटेल त्या संचालाच आपण व्याधी म्हणत नाही. पण मग कुठल्या एकत्रित संचाला एकच व्याधी असल्याचे ठरवतो? याबद्दल स्पष्ट निकष वैद्यकात सर्वमान्य नाहीत. लक्षणांच्या मार्फत काय कारणनिदान आणि उपचार करायचे आहेत? त्याबाबत वेगवेगळ्या व्यावहारिक उपयुक्तता मनात आणून आपण लक्षणसंच जोखू शकतो. उपयुक्ततेप्रमाणे हे निकष वेगवेगळे आहेत. अशा वेगवेगळ्या निकषांबाबत या लेखात ऊहापोह केलेला आहे.
लवासाचा 'आदर्श' घोटाळा - १
रोजगार, वीज, पाणी, रस्ते, यासारख्या मूलभूत गरजा भागविणार्या सोई-सुविधांची रेलचेल शहरी भागातच असल्यामुळे शहरीकरण अनिवार्य होत आहे. काही मूठभर शेतकरी व शेतमजूर सोडल्यास खेड्यातील लोंढेच्या लोंढे शहरात वस्त्या करत आहेत. खेडी ओस पडत आहेत. असे असले तरी शेतजमिनींचे मालक स्वत:च्या जमिनीला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा या प्रयत्नात असतात. एखादा शासन पुरस्कृत प्रकल्प त्या भागात येत असल्यास अशा शेतकर्यांना चेव चढतो व काही तरी निमित्त शोधून चळवळ - आंदोलन उभे करून जास्तीत जास्त नगद फायदा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात ते असतात. कदाचित एखादी खासगी कंपनी वा उद्योजक यांच्या डोक्यात मनी-मेकिंगची भन्नाट कल्पना असल्यास शेतकरी स्वत:ची जमीन फुंकून त्यांच्या मागे लागतात.
व्यंगचित्रे
डॉक्टर आणि पेशंट - १ - महेंद्र भावसार
डॉक्टर आणि पेशंट - 2 - महेंद्र भावसार
प्लॅस्टिक सर्जरी - १ - महेंद्र भावसार
प्लॅस्टिक सर्जरी - २ - महेंद्र भावसार
व्यंगचित्रे - कल्पनाविलास - प्रमोद सहस्रबुद्धे
छायाचित्रे
मधुसंचय - विशाल कुलकर्णी
कुतूहल - दीपक पट्टणशेट्टी
शिशिरातले झाड - धनंजय वैद्य
एकाकी - अभिजित यादव
प्रकाशवाट - शशांक जोशी
नैसर्गिक उद्गार चिह्न - नंदन होडावडेकर
संकीर्ण
कूटप्रश्न - प्रमोद सहस्रबुद्धे, वैभव कुलकर्णी, हैयो! हैयैयो!
बहिणाबाई चौधरींचा अक्षरखेळ - धनंजय वैद्य
साम्याभास - निखिल जोशी
चॉकोलेशियस - जाई जोशी
तुम्हाला हे ठाऊक आहे का? - प्रियाली
ऋणनिर्देश
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलेल्या सर्वांचे विशेष आभार! उपक्रम दिवाळी अंक निर्मितीच्या विविध पातळ्यांवर मोलाचे सहकार्य देणार्या खालील सहकार्यांचे विशेष आभारी आहोत.
संकेतस्थळबांधणी, अंकबांधणी: चित्तरंजन भट, शशांक जोशी
मुद्रितशोधन साहाय्य: धनंजय, नंदन होडावडेकर, आजानुकर्ण, प्रियाली
मुखपृष्ठ आणि सजावट: चित्तरंजन भट
उपक्रम दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणार्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
नैसर्गिक उद्गार चिह्न
येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये काढलेले छायाचित्र.
प्रकाशवाट
पन्हाळगडावरील अंबरखाना या धान्याच्या कोठाराच्या आतून दुपारच्यावेळी काढलेले छायाचित्र.
कॅमेरा: Canon EOS 500D