सा रम्या नगरी: बाली - २
बेसाखी हे इथलं सर्वात मोठं आणि सर्वात जुनं मंदिर. आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर माउंट अगुंग या ज्वालामुखीच्या पायथ्याशी आहे.

सा रम्या नगरी: बाली
इंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला प्राप्त झालेलं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचं स्थान. बाली बेटाच्या नावाचा रामायणातील सुग्रीव आणि बालीशी काहीतरी संबंघ असावा असे मला वाटत होते. पण बाली हे नाव एका संस्कृत शब्दापासून बनले आहे हे नंतर कळले. इंडोनेशिया जरी पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र असले तरी बाली आपली पुरातन हिंदू संस्कृती टिकवून आहे. इथे जवळजवळ ९० टक्के लोक हिंदू आहेत आणि अजूनही आपल्या पुरातन चालीरीती जपून आहेत.
छायाचित्र १ - संधिप्रकाशात अजून जो सोने...
क्लिंगमन डोम, ग्रेट स्मोकी माऊंटन: अॅपलेशिअन पर्वतरांगामधली सायंकाळ. सूर्याच्या मावळण्याबरोबर एक एक पर्वत अंधारात नाहीसा होत चालला होता.