आर्यभटीयातील अक्षरचिन्हे आणि खगोलशास्त्र - ३
ग्रहांचे आकारमान केवढे असावे याबद्दल आर्यभटाचे काही म्हणणे आहे. पृथ्वीचा परिघ हा मोजता येण्यासारखा आहे. या साठी उत्तर दक्षिण दिशेवरील दोन ठिकाणांचे अंतर लागते. एखाद्या ठिकाणाचे अक्षांश काढणे हे सोपे असते. (ध्रुवताऱ्यांचे कोन मापन केले की अक्षांश मिळतो). दोन ठिकाणातील अक्षांशाचा फरक आणि अंतर यावरून पृथ्वीचा व्यास/परिघ काढता येतो. आर्यभटाने पृथ्वीचा व्यास हा 1050 योजने एवढा दिला आहे. आणि तो सध्याच्या माहीत असलेल्या व्यासाशी मिळता जुळता आहे. ग्रहांचे व्यास मात्र एवढे सोपे नाहीत. चंद्र आणि सूर्याचे कोनीय परिमाण सहज मोजता येते. त्यावरून काही अंदाज बांधता येतो. पण तो तेवढा अचूक नसणार.
आर्यभटीयातील अक्षरचिन्हे आणि खगोलशास्त्र - १
आर्यभट हा भारतातल्या आद्य खगोलशास्त्रज्ञांपैकी एक. आर्यभटाच्या नावे अनेक प्रवाद आहेत. पृथ्वी गोल असून सूर्याभोवती फिरते असे अनुमान आर्यभटाने सगळ्यात आधी काढले होते असे काहींचे मत आहे. पुढील भारतीय खगोलशास्त्रज्ञांना/ज्योतिषांना हे मत मानवले नसल्याने आर्यभटमत त्यांनी त्यागले. असा त्याचा उत्तरार्ध. त्याच बरोबर खगोलशास्त्रातील कित्येक स्थिरांक आर्यभटाने पूर्वसुरींपेक्षा विशेषत: टॉलेमीपेक्षा अचूक काढले असे ही मानले जाते. आर्यभटाने कदाचित शून्याचा शोध लावला असेल असे अनुमान मी ऐकले आहे. या सर्वामुळे आर्यभटाबद्दल जाणून घेण्याची मनात उत्सुकता होती.
Π चा न संपणारा शोध - ३
√2 ही संख्या अपरिमेय असली तरी त्याबद्दल Π सारखे कष्ट घ्यायला कुणी तयार नव्हते. Πच्या अंकांचे कवितेत रूपांतर करणारे कवीसुद्धा त्याकाळी होते.
Π चा न संपणारा शोध - १
ग्रीकमधील सिराक्यूज राजाच्या राजमुकुटातील सोन्याचे प्रमाण योग्य आहे की नाही याचा शोध घेणार्या अर्किमिडीसचे पाण्याच्या टबमधून युरेका! युरेका!! असे ओरडत (नागडाच!) रस्त्यावर आल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. त्या काळचा युक्लिड या गणितज्ञाप्रमाणे अर्किमिडीस केवळ सैद्धांतिक उत्तरावर समाधान मानणारा गणितज्ञ नव्हता. खऱ्या अर्थाने तो एक सर्जनशील अभियंता होता. प्रचंड प्रमाणातील गोफण यंत्रणेची (catapults) रचना त्यानी केली होती. युद्धकाळात शत्रूंच्या अंगावर मोठमोठे दगड फेकण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. प्रचंड आकाराच्या आरश्यांचा वापर सूर्यकिरणांचे प्रतिबिंब केंद्रित करून शत्रूंच्या बोटी पेटवण्याची शक्कल त्यानी लढवली होती. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे वर्तुळाचे परिघ मोजण्यासाठी Π या संकल्पनेचे योगदान त्याचे होते.
छायाचित्रे
छद्मावरण (Camouflage) - भालचंद्र, रंगीलो थारो ढोलणा - अभिजा
तसे कवडसे तीत - नंदन, श्वेतपुष्प - शशांक
शिशिर - वरूण, रामलीला - आकाश गुप्ते
हा माझा रंग वेगळा (Individualism) - विशाल, आभाळाचे गिटार - संजय