उपक्रम दिवाळी अंक २०११ - अनुक्रमणिका

प्रभाकर नानावटी

रोजगार, वीज, पाणी, रस्ते, यासारख्या मूलभूत गरजा भागविणार्‍या सोई-सुविधांची रेलचेल शहरी भागातच असल्यामुळे शहरीकरण अनिवार्य होत आहे. काही मूठभर शेतकरी व शेतमजूर सोडल्यास खेड्यातील लोंढेच्या लोंढे शहरात वस्त्या करत आहेत. खेडी ओस पडत आहेत. असे असले तरी शेतजमिनींचे मालक स्वत:च्या जमिनीला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा या प्रयत्नात असतात. एखादा शासन...

धनंजय वैद्य

लघुसारांश : शारीर लक्षणांच्या वाटेल त्या संचालाच आपण व्याधी म्हणत नाही. पण मग कुठल्या एकत्रित संचाला एकच व्याधी असल्याचे ठरवतो? याबद्दल स्पष्ट निकष वैद्यकात सर्वमान्य नाहीत. लक्षणांच्या मार्फत काय कारणनिदान आणि उपचार करायचे आहेत? त्याबाबत वेगवेगळ्या व्यावहारिक उपयुक्तता मनात आणून आपण लक्षणसंच जोखू शकतो. उपयुक्ततेप्रमाणे हे निकष वेगवेगळे आहेत....

आनंद घारे

कापड, भांडी, कागद वगैरे साध्या गोष्टींपासून ते फ्रिज, टीव्ही, काँप्यूटर वगैरेपर्यंत घरात, ऑफिसात किंवा दुकानात आजकाल दिसणार्‍या बहुतांश वस्तू निरनिराळ्या यंत्रांद्वारे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या असतात. त्या कारखान्यांमधली ही यंत्रे कशा प्रकारची असतात, ती कशी चालतात, वगैरेंबद्दल सर्वसामान्य माणसांना काही कल्पना नसते. त्याच्याही पलीकडे जाऊन...

अरुंधती कुलकर्णी

गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज...

प्रमोद सहस्रबुद्धे

मखि भखि फखि धखि णखि ञखि

ङखि हस्झ स्ककि किष्ग श्घकि किध्व ।

घ्लकि किग्र हक्य धकि किच

स्ग श्झ ङ्व क्ल प्त फ छ कालर्धज्या ॥


आर्यभटीयातील हे बारावे कडवे.

ऋषिकेश

चांगली आठवडाभर सुट्टी काढून फिरायला जाणार कुठे तर भूतानला! हे सांगितल्यावर मिळणार्‍या प्रतिक्रिया फारच मजेशीर होत्या. एकतर आधी भूतान हा वेगळा देश आहे हेच अनेकांच्या गावी नव्हतं. त्यात ते कुठे आहे, तिथे बघायला काय आहे वगैरेची माहिती असणं तसं दुर्मिळ होतं. काहींनी भूतान ऐकलं होतं मात्र ते शहर आहे, राज्य आहे की देश याबद्दल ते साशंक होते. काहींच्या...

अरविंद कोल्हटकर

सुमारे ३२०० वर्षांपूर्वी डार्डनेल्स सामुद्रधुनीच्या प्रदेशात ट्रॉय नावाचे एक शहर होते. तिथला राजा होता प्रायम आणि शहरातले रहिवासी नागरिक शेती, व्यापार, मासेमारी अशा व्यवसायांवर सुखी जीवन जगत होते. ग्रीक देवांना त्यांचे हे सुखी आयुष्य पाहून मत्सर वाटते असे आणि म्हणून शहर उद्ध्वस्त करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.

गौरी दाभोळकर

कोण ही झांतपी अन कोण ही यशोधरा? पुरुषप्रधान संस्कृती आणि इतिहासाच्या बुरख्याआड हरवलेल्या दोघीजणी! आणखी अशा कितीतरी असतील ज्यांनी आपल्या कर्तबगार पतीसाठी मोठे त्याग केले आणि त्याची नोंदसुद्दा कुठे नाही. झांतपी तरी दूर अथेन्स नगरीतील "सॉक्रेटीस" नावाच्या तत्त्ववेत्त्याची बायको आणि त्याच्या तीन पोरांची आई. पण यशोधरा ('यशोदा' नव्हे!) ही तर भगवान...

रोचना

स्कॉटलंडच्या औटर हेब्रिडीज द्वीपांचा रहिवासी कॉलिन मकेंझी १७८३ साली वयाच्या २९व्या वर्षी इंडिया कंपनीच्या लष्करात नोकरी पत्करून भारतात आला. मकेंझीच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण खाते कंपनी सरकाराच्या विस्ताराचे आणि स्थिरावण्याचे प्रबळ साधन बनले. नकाशाशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, आणि बारीक भौगोलिक-लष्करी ज्ञान यांचे विलक्षण मिश्रण असलेल्या...

आशिष महाबळ

पृथ्वीतलावरील सर्वात स्वार्थी प्राणी निर्विवादपणे मानव आहे. हे बहुधा आपल्या विचारांमधे आपल्या जनुकांकडुन (genes) आले असावे. आपल्या जीन्स स्वार्थी असल्यानेच आपण निसर्गात टिकलो, विविध परिस्थितींमधे जगायला व फोफावायला शिकलो. या स्वार्थाचे केंद्र नेमके काय आहे व त्याचा परीघ किती आहे याचा थांग लागणे तसे कठीण, पण धार्मिक, प्रादेशिक व त्यामुळे राजकीय...

प्रियाली

वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन...

नंदन

पहिल्या महायुद्धानंतर जे अनेक कलाकार सँटा फे परिसराकडे वळले, त्यांच्यात जॉर्जिया ओ'कीफ आणि अल्फ्रेड स्टिगलिझ ह्या दांपत्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

३_१४ अदिती

१९३३ साली बेल लॅब्जमधे कार्ल जान्स्की या अभियंत्याकडे रेडीओ खगोलशास्त्राची सुरूवात करण्याचे श्रेय जाते. बेल लॅब्जमधे रेडीओ लहरी वापरून दळणवळणाची साधने विकसित करण्याचे काम सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून जान्स्कीला एक प्रकल्प दिला होता तो म्हणजे रेडीओ लहरींमधला नॉइज(?) आणि त्याचे स्रोत यांची माहिती गोळा...

प्रमोद सहस्रबुद्धे, य. ना. वालावलकर

१. बुद्धीबळपटावर वजीर - प्रमोद सहस्रबुद्धे

२. बेरीज शंभर,गुणाकार अधिकतम - य. ना. वालावलकर

३. तर्कदोष शोधा -प्रमोद सहस्रबुद्धे

धनंजय वैद्य, मन

काहीतरी'च' काय? - धनंजय वैद्य

तुम्हाला हे ठाऊक आहे का? - मन

अंजली

दिवाळी जवळ आली की बाजारात विविध आकाराचे छान छान कलात्मक आकाशकंदील बघायला मिळतात. बाजारपेठ ह्या विविध आकारांच्या आकाशकंदीलांनी उजळून निघते. पण आकाशकंदील म्हटले की डोळ्यांसमोर येतो, तो चांदणीचाच आकार. मग त्यात पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी...

भालचंद्र, अभिजा, नंदन, शशांक, वरुण, आकाश गुप्ते, विशाल, संजय