संपादकीय
उपक्रमच्या सर्व सदस्यांना, वाचकांना आणि हितचिंतकांना दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी विशेषांकाचे यंदा पाचवे वर्ष. गेली चार वर्षे अविरत चालू असलेली ही परंपरा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढे चालवू शकलो त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत. यावर्षीचा दिवाळी विशेषांकही, उपक्रम सदस्यांच्या योगदानाने, उपक्रमच्या लौकिकाला साजेसा असाच झाला आहे. या विशेषांकातील लेख वाचकांना निश्चितच दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण वाटतील, त्यांच्या ज्ञानात, माहितीत ते भर टाकतील आणि म्हणूनच त्यांना ते आवडतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
ऋणनिर्देश
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलेल्या सर्वांचे विशेष आभार! ज्यांचे दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट होऊ शकले नाही त्यांचे आम्ही क्षामाप्रार्थी आहोत. त्यांनी पुढील वर्षी उपक्रमच्या लेखनविषयक धोरणात बसेल असे साहित्य पाठवावे अशी विनंती.
उपक्रम दिवाळी अंक निर्मितीच्या विविध पातळ्यांवर मोलाचे सहकार्य देणार्या खालील सहकार्यांचे विशेष आभारी आहोत.
संकेतस्थळबांधणी, अंकबांधणी: चित्तरंजन भट, शशांक जोशी
मुद्रितशोधन साहाय्य: नंदन होडावडेकर, योगेश धिमते
मुखपृष्ठ आणि सजावट: चित्तरंजन भट
मुखपृष्ठावरील छायाचित्र : अमेय देशपांडे
सूचीशास्त्र : काही अनुभव - २
नियतकालिकांची सूची करताना नियतकालिकांची सूची, त्यातील लेखांची सूची आणि नियतकालिकांतील लेखांची वर्णनात्मक सूची अशा पद्धतीने करता येते. फक्त नियतकालिकांची सूची करणे त्यामानाने सोपे असते. पाश्चात्य देशांमधून यासारख्या सूचींच्या उपक्रमांना प्रोत्साहन व महत्त्व फार पूर्वीपासून दिले गेले. आजही दिले जाते. मराठी भाषेच्या बाबतीत इ.स.१९६५ नंतर या कार्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी इ.स.१९१५ मध्ये भारत नियतकालिकदीपिकेमध्ये अनेक भाषांतील वृत्तपत्रे व मासिकांची माहिती दिलेली आहे. इ.स.१९१९ मध्ये य. रा. दाते व रा. त्र्यं.
सूचीशास्त्र : काही अनुभव - १
संशोधनाची सुरुवात सूचीपासूनच व्हावी असे अपेक्षित आहे/असते. कोणत्याही क्षेत्रातील संशोधन करताना पूर्वसूरीने केलेल्या कामाची पूर्णपणे माहिती असल्यास ते कार्य पुढील काम करण्यास मार्गदर्शक ठरते. आजच्या प्रगतिशील, विस्तारशील, विज्ञाननिष्ठ क्षेत्रात किंवा साहित्यक्षेत्रातही जिज्ञासू अभ्यासकाला नेमकी माहिती मिळवून देण्याचे काम सूची करते. सूची हा शब्द निर्देश, मार्गदर्शिका अशा अर्थाने वापरला जातो. प्रकाशित ग्रंथ किंवा अप्रकाशित हस्तलिखितांच्या विशिष्ट नियमानुसार केलेल्या यादीच्या आधारे हवे असलेले संदर्भ अचूकपणे शोधणे शक्य होते तिला ’सूची’ म्हणता येईल. सूचीचा संबंध अध्यापनाशी आणि संशोधनाशी विशेषत्वाने असतो. म्हणूनच संशोधनासाठी केलेली सूची अचूक, जास्तीत जास्त निर्दोष असणे गरजेचे असते.
छायाचित्रे
संधिप्रकाशात अजून जो सोने... - अभिजित यादव
कमानीय (वाडा कृष्णधवल ) - अमेय देशपांडे
काळाच्या पाऊलखुणा - शशांक जोशी
नवलाख विजेचे दीप तळपती येथ... - विशाल कुलकर्णी
कार्यरत - सुवर्णा
उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२
सा रम्या नगरी: बाली - ३
केच्याक शिवाय लेगॉंग आणि बारोंग हे बालीमधले स्थानिक नृत्याविष्कारही बालीला भेट दिल्यावर एकदा तरी आवर्जून पाहावेत असे. यापैकी लेगॉंग हा तुलनेने नवीन असलेला आणि प्रामुख्याने हाताच्या बोटांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांनी साकारलेला नृत्यप्रकार.