ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण - २

आशिष महाबळ

शिकागो विद्यापिठाची इंडॉलॉजिस्ट Wendy Doniger म्हणते की संस्कृतमधील प्रत्येक शब्द स्वत:च्याच विरुद्धार्थी असतो, कोणत्यातरी देवाचे नाव असते आणि कामशास्त्रातील एक अंगस्थिती असते. तसेच जरी नसले तरी केवळ २००० धातुंपासुन जे विश्व निर्माण करता येते त्याला तोड नाही. सहाव्या शतकातील भारवीची नक्कल करुन शब्दसंभारात त्यालाही मागे टाकणारा आठव्या शतकातील माघ इतका यशस्वी ठरला की त्याच्या 'शिशुपालवध' नामक काव्यात संस्कृतमधील प्रत्येक शब्द आहे अशी वदंता आहे. दण्डिन शब्दलालित्याकरता प्रसिद्ध होता, तर कालिदास उपमांकरता.

| २


संस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - ३

अरविंद कोल्हटकर

भाग ३

उडणार्‍यांकडून आता चालणार्‍या प्राण्यांकडे वळू. सिंह आणि हत्ती ह्या दोन प्राण्यांना ह्या संकेतविश्वात विशेष स्थान आहे. सिंह हे नेहमी शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून दिसतात. त्यांचे आणि हत्तीचे वैर असून तो हत्तींवर चाल करून त्यांच्यावर विजय मिळवतात. असे हत्ती विशेषेकरून मदोन्मत्त असतात. अशा वेळी त्यांच्या गंडस्थलांमधून मद वाहत असतो. त्या मदाच्या वासाने आकृष्ट झालेले भुंगे हत्तींना अंध बनवतात आणि ते हत्ती सैरावैरा इकडेतिकडे धावू लागतात. हत्तींच्या गंडस्थलांमध्ये मोती असतात आणि हत्तींना सिहाने मारल्यावर हे मोती विखुरतात.

| | ३


संस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - २

अरविंद कोल्हटकर

भाग २

पक्षिगणातील राजहंस, कोकिळ, चक्रवाक आणि चकोर ह्या अन्य चौघांवरतीहि संकेत बेतले आहेत. राजहंस हा मानससरोवरात राहतो आणि तेथील सुवर्णकमळांचा चारा खातो, तसेच दुधात पाणी मिसळले तर ते तो वेगळे करू शकतो असे दोन संकेत राजहंसाविषयी आहेत.

अस्ति यद्यपि सर्वत्र नीरं नीरजमण्डितम्।
रमते न मरालस्य मानसं मानसं विना॥

कमलपुष्पांनी मंडित असे पाणी सर्वत्र असले तरी हंसाचे मन मानस सरोवराव्यतिरिक्त कोठेच रमत नाही.

कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो हंस: कुतो मानसात्।
किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भ: सुधासन्निभम्।

| २ |


संस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - १

अरविंद कोल्हटकर

संस्कृत वाङ्मयात काही ठराविक संकेत आहेत आणि वाङ्मयाच्या रसिक आस्वादकर्त्याला हे संकेत माहीत असतात किंवा असावेत, अशी अपेक्षा असते. अशा संकेतांमागे कसल्याही प्रकारची तर्कसंगतता वा शास्त्रीय अर्थ शोधणे म्हणजे काळाचा अपव्यय आहे; कारण ह्या संकेतांमागे कसलेच शास्त्र नाही. हे संकेत आहेत तसे मान्य करून पुढे गेल्यासच त्या पुढील कलाकृतीचा आस्वाद घेता येईल. अशा सर्वसामान्यपणे माहीत असलेल्या काही संकेतांचे संकलन करून प्रत्येकाच्या उदाहरणांचे प्रसिद्ध वा अप्रसिद्ध श्लोक त्यांच्या काहीशा स्वैर भाषांतरासहित येथे एकत्रित केले आहेत.

१ | |


ड्रेकचे समीकरण आणि थोडी आकडेमोड

वरदा व. वैद्य

१९५० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या एन्रिको फर्मीने सुप्रसिद्ध प्रश्न विचारला - “सगळे आहेत तरी कुठे?”. ह्या विश्वाचे वय पाहता आणि त्यातील तार्‍यांची संख्या पाहता विश्वात जीवांचा बुजबुजाट दिसायला हवा. मात्र असे प्रगत वा अप्रगत परग्रहवासी असल्याचा आपल्याकडे पुरावा मात्र नाही. हाच तो सुप्रसिद्ध 'फर्मीचा विरोधाभास' (paradox). फर्मीने हा सुप्रसिद्ध प्रश्न विचारल्याला दशक उलटून गेल्यावर फ्रॅंक ड्रेक ह्या अमेरिकन खगोलतज्ज्ञाने एक समीकरण मांडले. हे ड्रेकचे समीकरण आपल्या आकाशगंगेमध्ये प्रगत समाज किती असू शकतील ह्याचा अंदाज मांडते.


पंप - सर्वंकष माहिती ४

आनंद घारे

समजा आपण अगदी एकाच प्रकारचे आणि आकाराचे दोन पंप एका जागी बसवले आणि पाइपिंग करतांना ते एकमेकांना समांतरपणे जोडले तर एका वेळी दोन्ही चालवल्यास त्यातून होणारा पाण्याचा पुरवठा एका पंपाच्या दुप्पट होईल. तेच दोन पंप सीरिजमध्ये जोडले तर एका पंपामधून बाहेर पडलेले पाणी दुस-या पंपामध्ये जाईल, त्याचा दाब आणखी वाढेल आणि ते पाणी दुप्पट दाबाने त्यातून बाहेर निघेल. पाइपिंग करतांना यातले दोन्ही पर्याय देऊन आपल्याला हवा तो वापरणेही शक्य आहे. या तत्त्वांचा उपयोग करून मोठ्या कारखान्यात अनेक प्रकारचे आणि आकारांचे पंप बसवतात आणि ते विशिष्ट पद्धतीने जोडले जातात.


पंप - सर्वंकष माहिती ३

आनंद घारे

पंप (उत्तरार्ध)


पंप - सर्वंकष माहिती २

आनंद घारे

स्टोव्हचा पंप आडवा असतो आणि सायकलीच्या चाकात म्हणजे तिच्या टायरच्या आतील ट्यूबमध्ये हवा भरणारा पंप उभा धरून चालवतात एवढा फरक सोडला तर सिलिंडर, पिस्टन, वॉशर वगैरे त्याचे भाग स्टोव्हच्या पंपासारखेच पण मोठ्या आकाराचे असतात. चाकात भरलेली हवा पंपात परत येऊ नये यासाठी आवश्यक असलेली झडप सायकलच्या चाकाच्या ट्यूबलाच जोडलेली असते. ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी पंपाची नळी त्या व्हॉल्व्हला जोडतात. पंपाचा दांडा वर ओढताना आजूबाजूची हवा सिलिंडरमध्ये शिरते आणि तो खाली दाबला की त्या हवेचा दाब वाढतो आणि व्हॉल्व्ह उघडून ती हवा सायकलच्या ट्यूबमध्ये भरली जाते.


पंप - सर्वंकष माहिती १

आनंद घारे

'पंप' हा इंग्रजी शब्द आता आपल्या इतक्या ओळखीचा झाला आहे की तो मराठी भाषेतलाच वाटतो. 'क्षेपक', 'उदंचक' यासारखे पर्यायी शब्द सुचवले गेले आहेत, पण मला ते 'पाचक, रेचक' या पठडीतले वाटतात. आंग्लभाषा न शिकलेल्या माझ्या आईकडून लहानपणी मिळालेला 'पंप' हाच शब्द मी या लेखात सगळीकडे वापरला आहे. पंप जरी सर्वांच्या ओळखीचा असला आणि घरात, कार्यालयात किंवा रस्त्यातून जाता जाता त्याचे दर्शनही होत असले तरी तो नेमका कसा चालतो, हे अनेकांना ठाऊक नसेल. ते थोडक्यात सांगण्याचा हा एक प्रयत्न.


पसायदानातील प्रक्षिप्त ओवी

य. ना. वालावलकर

पसायदान हे एक अपूर्व आणि उदात्त असे मागणे आहे. 'आता विश्वात्मके देवे...' या ओवीपासून या दानयाचनेची उदात्तता ओवीगणिक वाढत जाते. ती 'किंबहुना सर्व सुखी' या सातव्या ओवीत परिसीमा गाठते. इथे किंबहुनाचा अर्थ 'याहून अधिक काही मागण्याचे कारणच उरले नाही' असा होतो. या ओवीनंतर आता सर्वात्मक देवाचे दानप्रसादवचन व्हावे हे क्रमप्राप्त वाटते. पण तसे न होता, आणि ग्रंथोपजीविये॥ विशेषे लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होवावे जी ॥ ही ओवी येते आणि रसभंग होतो.