आयसीसीएस - सांस्कृतिक समन्वय साधणार्या संस्थेचा परीचय
गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत आयसीसीएस ने केलेले कार्य हे केवळ त्या संस्थेचे कार्य म्हणून सांगण्याचा उद्देश नसून त्यातून निघणार्या समन्वयी भूमिकेमुळे विविध पूर्वापार चालत आलेल्या आणि आजही पाळल्या जात असलेल्या संस्कृती कशा जवळ येऊ शकतात हे यातून बघता येऊ शकते. आयसीसीएस चे उद्दिष्ट नावात म्हटल्याप्रमाणे विविध संस्कृतींचा अभ्यास हे आहे. त्यासाठी तरूण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन अभ्यासास प्रोत्साहन देणे, विविध प्राचीन परंपरांच्या जगभरातील समाजाशी संपर्क साधून माहिती एकत्रित करणे, विविध संस्कृतींमधील महत्त्वाचे लेखन भाषांतरित करणे, तसेच तत्त्वज्ञान, धर्म, समाज, वाड्मय, इतिहास, आणि कला यांचा तुलनात्मक अभ्यास अशा काही ठळक गोष्टी सांगता येतील.
माझे संगीताचे प्रयोग
घरी भीमसेन जोशींच्या अभंगांच्या पलिकडे फार काही संगीत नसायचे. तिसरी-चौथीत शाळेतल्या एका बाईंकडे काही दिवस पेटी शिकायला गेलो होतो. मग सातवी-आठवीत असतांना शेजारी रहाणार्या एका दादामुळे हिंदी सिनेमातील गाणी ऐकायची सवय लागली. या शिवाय संगीताशी फार काही संबंध तिशीपर्यंत आला नाही. सर्व प्रकारची गाणी ऐकणे सुरु असायचे, पण
नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास
भाग २
दोन जुळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी एकेकट्याने जावून नाडिग्रंथावलोकन केले होते. त्यांच्या पट्टींमध्ये त्यांच्या जुळेपणाबद्दल उल्लेख येतांना काय प्रकारची शब्दयोजना केली जाते, हे बघूया. त्यापैकी लहान असलेल्या भावंडाच्या वहीमध्ये खालीलप्रमाणे श्लोक येतो:
சித்தார்த்தியிலே கடைதிங்கள் தசமோடொன்று
அறியமதி நாள்தானே ஆதிரைமீனும்
வாதிரைமீனும் மதியாழில் சிகிமால்கலசம்
கலசம்மேல் ரவிமீனில் சுங்கன்வருடை
கூறாத மற்றகோட்கள் வேங்கையில்காணும்
नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास
नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. विविध विषयांच्या अभ्यासकांसाठी नाडिग्रंथांमधील रोचकता ही केवळ भविष्यकथनापुरतीच मर्यादित राहिलेली नसून त्याही पलिकडील अनेक विषयांच्यावर आज चर्चा होतांना दिसते. ह्यात मुख्यत: नाडिग्रंथांतील लिपी, भाषा, उपयोजिलेले काव्यप्रकार अशा; थोडक्यात, ज्योतिषशास्त्राहून भिन्न अशा विषयांवर मोठ्या प्रमाणात अभ्यास होतांना दिसून येतो. ह्याच अनुषंगाने जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे झालेल्या नाडिग्रंथ अधिवेशनामध्ये मी "कूटलिपी - एक विचार" हा नाडिग्रंथांत आढळणा-या लिपीबाबतचा विश्लेषणात्मक शोधनिबंध चर्चेसाठी पाठवून दिला होता.
कलकत्ता कॅलेडोस्कोप
बहुभाषिक वस्तुस्थिती भारताच्या प्रत्येक मोठ्या शहराला लागू आहे - मुंबईसारखे महानगर असो, हैदराबाद सारखे ऐतिहासिक शहर असो, वा अलीकडे स्थलांतराने झपाट्याने बदलत जाणारी पुणे-बंगलोर ही शहरे असोत. भारतीय शहरी जीवन म्हणजेच एका दृष्टीने बहुभाषिक जीवन. असे असले तरी, प्रत्येक शहरातील भाषिक देवाण-घेवाण निराळी असते. त्या शहराच्या विशिष्ट
ट्रॅव्हल्स
भाग ४
युरी गेलर ज्यासाठी प्रसिद्ध होता, तो चमचे वाकवण्याचा प्रयोग स्वतः प्रत्यक्ष केल्याचेही क्रायटनने वर्णन केले आहे. त्यात असेही म्हटले आहे की या सगळ्या सायकिक अनुभवात सुरुवातीला त्याला खूप उत्साह आणि रहस्यमयता वाटे. पण जसेजसे ते नेहमीचे, सततचे होत जाते, तसेतसे ते कंटाळवाणे होत जाते. चमचे वाकवण्याबद्दल एम आय टी ह्या संस्थेतील एका प्रोफेसरशी चर्चा करताना त्याने एका ठिकाणी म्हटले आहे, की जगातील प्रत्येक गोष्ट का घडते हे काही तो शोधायला जात नाही, ते त्याचे कर्तव्यही नाही. अनुभव घेऊन त्या अनुभवांचे वर्णन करणे व त्याचा त्याच्यावरचा परिणाम हेच त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.