छायाचित्र - सूर्यफूल

ध्रुव

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 


अक्षौहिणी

शरद

अक्षौहिणी


 
महाभारतात भारतीय युध्दामध्ये अठरा अक्षौहिणी योध्दे लढले व बोटावर मोजण्या एवढेच जिवंत राहिले हे सर्वाच्या लक्षात असते. पण एक अक्षौहिणी म्हणजे नक्की किती

हे माहित असतेच असे नाही.आज त्याचे कोष्टक पाहू.

१ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति = १ पत्ति

३ पत्ति = सेनामुख

३ सेनामुख = गुल्म

३ गुल्म = गण

३ गण = वाहिनी

३ वाहिनी = पृतना

३ पृतना = चमू

३ चमू = अनीकिनी

१० अनीकिनी = अक्षौहिणी

एका अक्षौहिणीत

२१८७० गज

२१८७० रथ

१०९३५० पायदळ

६५६१० अश्व. [अबब !]


तर्कक्रीडा: सांघिक परीक्षा

य. ना. वालावलकर

एका संस्थेत सोळा प्रशिक्षणार्थी घ्यायचे होते.प्राथमिक चाचणी घेऊन सोळा जण निवडले.त्यांना अंतिम कसोटीसासाठी बोलावले.सर्वांना एका वर्गात बसवून पुढील प्रमाणे निवेदन केले :--

  • या कसोटीत सोळा जणांचा संघ भाग घेईल.तुमची नावे आणि क्रमांक या फलकावर आहेत.
  • तुम्ही फलकाकडे तोंड करून एका मागे एक असे उभे राहायचे.प्रथम क्र.१. त्याच्या मागे काही अंतरावर क्र. २.त्याच्या मागे क्र.३...या प्रमाणे शेवटी क्र.१६.
  • तुमच्या हाती एक साधन असेल. त्यावर दोन बटणे असतील.काळे आणि पांढरे.

तर्कक्रीडा: चार संशोधक

य. ना. वालावलकर

पंचतंत्रातील गोष्टींत अनेक निसर्ग वर्णने आहेत. पुण्यातील चार विद्वानांनी त्यांतील पर्वत,जलाशय,वृक्ष,पशुपक्षी,यांच्या वर्णनांचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यावरून प्रत्यक्ष राना वनात फ़िरून त्यांनी ’लघुपतनक’कावळ्याचे कोटर असलेला वृक्ष , ’अरिमर्दन’ घुबडाचा गड,’हिरण्यक’ मूषकाचे विवर,’मंथरक’ कूर्माचे सरोवर अशी अनेक स्थाने शोधून काढली.त्यांचा "पंचतंत्रातील वनस्थली" हा शोधप्रबंध अनेकांनी वाचला असेल.

दगड आणि पृथ्वी


दुरितांचे तिमिर जावो...

विकास

"बलसागर आणि विश्वात शोभून राहू शकेल" अशा भारताचा ल. सा. वि. शोधण्यासाठी व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झालाच तर तीन टप्प्यांत करावा लागेल: पहिला असेल आज आपण कोण आहोत, दुसरा असेल आपल्यात अजून काय कमी आहे आणि तिसरा असेल या अपूर्णतेस तोंड देऊन परिपूर्ण होण्याच्या मध्ये नक्की कुठले अडथळे आपल्याला आहेत ज्यांना "पूर्णपणे" दूर करून आपल्याला पुढे जायचे आहे.

 


वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग क्र. ७

चित्रा

पृष्ठ २

तपासप्रक्रिया आणि निष्कर्ष


वर्ल्ड ट्रेड सेंटर ७ चे ABC News वरील चित्र


वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग क्र. ७

चित्रा

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टोलेजंग इमारती आणि ९/११ चे अतिरेकी हल्ले हे आंतरराष्ट्रीय घडामोडींची बातमी ठेवणार्‍यांच्या स्मरणात असेलच. पण ज्यावेळी ह्या दोन इमारती कोसळल्या, त्याच्याच नंतर काही तासांमध्ये जवळ असलेली एक दुसरी इमारत म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत क्र. ७ पडली ते आता काहीसे विस्मृतीत गेले आहे.

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी

पृष्ठ ३

आता आपण प्रस्तुत चाचणीच्या निष्कर्षांबद्दल माहिती घेऊ. ५१ ज्योतिषी मंडळींनी जरी पत्रिकांचे संच मागवून घेतले असले तरी शेवटी फक्त २७ मंडळींनीच त्यांची उत्तरे परत पाठवली. बाकी २४ मंडळींनी उत्तरे न पाठवण्याबद्दल काही खुलासाही केलेला नाही. या सत्तावीस ज्योतिषांपैकी २६ जणांनी त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवली आहे. त्या माहितीचे विश्लेषण खालील प्रमाणे.
१५ ज्योतिषी छंद म्हणून ज्योतिष पाहतात तर ८ जण हे व्यावसायिक ज्योतिषी आहेत. अन्य ३ जणांनी ही माहिती पुरवली नाही. ८ व्यावसायिक ज्योतिषांचा सरासरी अनुभव १४. ४ वर्षे एवढा आहे.