ट्रॅव्हल्स
भाग २
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्याची एक कादंबरी सिनेमासाठी बर्याच मोठया किमतीला विकली जाऊन तो एकदम प्रसिद्ध झाला. त्या वेळचे त्याचे लोकांच्या अचानक बदललेल्या वागणुकीबद्दलचे भाष्य, असे अचानक वैद्यक सोडून वेगळे आयुष्य जगायच्या घेतलेल्या निर्णयाबद्दलचे भाष्य, त्याला एक जीवनाबद्दलची आगळीच सखोल जाणीव होती हेच दर्शवते.
ट्रॅव्हल्स
"ज्युरासिक पार्क" या स्टीवन स्पिलबर्गने दिग्दर्शित केलेल्या सुप्रसिद्ध सिनेमामुळे मूळ कथालेखक मायकेल क्रायटनचे नाव सर्वांना माहीत आहे. अर्थात ज्युरासिक पार्क सोडून "काँगो", "द लॉस्ट वर्ल्ड", "द ग्रेट ट्रेन रॉबरी" अशा अनेक प्रसिध्द पुस्तकांचाही तो जनक आहेच. अधूनमधून अति विश्लेषण, खूप शास्त्राधारित माहिती-स्पष्टीकरणे लिहिल्यामुळे क्रायटनची पुस्तके वाचणे माझ्यासारख्या सामान्य ( म्हणजे शास्त्रात विशेष गती नसलेल्या ) वाचकाला रटाळ वाटू शकते. परंतु मूळ कथानकाचा गाभा आणि शैली अतिशय चित्ताकर्षक, नावीन्यपूर्ण असल्याने पुस्तक पटकन बाजूला ठेवले जात नाही.
"नाही! नाही म्हणजे काय?"
बाळ अगदी सुरुवातीला 'आई', 'बाबा' शब्द शिकते, पण त्यानंतर खूपच लवकर "नाही!" हा शब्द शिकते. दीड-दोन वर्षांच्या वयात "नाही-नको" हे शब्द वापरून बाळ पालकांना किती प्रभावीरीत्या बेजार करते, त्याची वैयक्तिक आठवण नसली, तरी असा प्रसंग आपणा सर्वांच्या समोर जरूर घडलेला असतो. इतक्या जुन्या ओळखीचा हा "नाही" शब्द आहे...
कीं घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
महाराष्ट्राची महती गाणारी अनेक गाणी आहेत; सुवर्णमहोत्सवाच्या या वर्षात आपल्या राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला जाईलच. मात्र या सार्या बिरुदांमध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची उपाधी म्हणजे, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून मानले गेलेले आहे. सामाजिक उन्नयनाच्या विविध बाबींकरता झटणार्या कार्यकर्त्यांच्या पिढ्यांमागून पिढ्या जिल्ह्याजिल्ह्यातून येथे काम करताना दिसतात. अनिल अवचट, अभय बंग, आमटे परिवार ही नावे आपल्या सर्वांना अपरिचित बिलकुल नाहीत. या सर्वार्थाने मोठ्या माणसांच्या नंतर आलेल्या पिढीतल्या , नव्या दमाच्या लोकांची ओळख प्रस्तुत सदरावाटे करून देण्याचा, हा एक नम्र प्रयत्न.
सा रम्या नगरी!
भारतीय द्वीपकल्पात आर्य किंवा वैदिक संस्कृतीचा प्रसार इ.स.पूर्व 1300 पासून सुरू झाला असे आता सर्वसाधारणपणे मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या द्वीपकल्पाच्या वायव्येला असलेल्या व हिंदुकुश पर्वतराजींच्या पलीकडच्या बाजूस या वैदिक संस्कृतीची सख्खी बहीण शोभेल अशी एक संस्कृती किंवा एक धर्म याच सुमारास उदयास येत होता. सध्याच्या इराणचा पूर्वेकडचा भाग व अफगाणिस्तानचा दक्षिणेकडचा भाग या मधे झरतृष्ट या प्रेषिताच्या किंवा धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली या नवीन अग्निपूजक संस्कृतीचा किंवा धर्माचा झपाट्याने प्रसार होत गेला.
जपानी शिकताना
अनेकांकडून ऐकले होते की जपानी कठीण भाषा आहे. त्यात अक्षरांची संख्याच तीन हजार आहे. शब्द, वाक्यरचना, व्याकरण सगळंच वेगळं आणि कठीण आहे. त्यात लिहायला-वाचायला चित्रलिपी आहे. आधी पासून एक ना दोन गोष्टी सतत कानावर पडत असतात, मात्र जपान आणि जपानी माणसाबद्दलचं सुप्त आकर्षण मनात घर करून होतं; त्यामुळे हे धाडस करायचं ठरवलं आणि जपानी भाषेबरोबरचा माझा प्रवास सुरू झाला.
विज्ञानाची अपरिहार्यता
सजीवांच्या पुनरुत्पादनादरम्यान जी म्यूटेशन घडतात त्यांचेही काही विवेकी 'कारण' नसते. "त्या सजीवाला केवळ असे 'वाटते' की पिल्लांना नवा जनुक अधिक फायदेशीर ठरेल" असे त्या म्यूटेशनचे वर्णन शक्य आहे. हे म्यूटेशन मूळ जनुकापेक्षा निराळी भाकिते करते. उदा., मूळ जनुक मेलॅनिन कमी बनविणारे असेल आणि नवे जनुक अधिक मेलॅनिन बनविणारे असेल तर मूळ जनुकाने असे भाकित केलेले असते की "ऊन वाढणार नसून त्वचेच्या कर्करोगाची भीती नाही" आणि नव्या जनुकाचे भाकित असते की "ऊन कमी होणार नसून ड जीवनसत्वाची कमतरता भासण्याची भीती नाही". ज्या जनुकाचे भाकित योग्य ठरते त्याची धारक पिल्ले अधिक संख्येने टिकतात. परंतु, पराभूत जनुक कमी संखेने टिकून राहिल्यास जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा त्याची भाकिते खरी ठरू लागतात आणि त्याच्या धारक पिल्लांची संख्या पुन्हा वाढू लागते.
लोकायत उर्फ चार्वाक दर्शन
दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. मी कोण, मेल्यानंतर शरीरातून काय जाते, जगाची उत्पत्ती कशी झाली, अशा गोष्टींचा विचार दर्शने करतात. अशी दर्शने अनेक आहेत. वेदप्रामाण्य़ मानणारी, देवावर व परलोकावर विश्वास ठेवणारी ती आस्तिक. लोकायत हे एकमेव दर्शन या तिन्हींना नाकारते. बौद्ध व जैन दर्शने वेदप्रामाण्य व देव नाकारतात पण परलोकावर विश्वास ठेवतात. त्यांना नास्तिक म्हणायची पद्धत आहे.